शतकवीर पृथ्वी शाॅने केला मोठा खुलासा

भारतीय संघाकडून मिळालेल्या संधीचा फायदा घेत पृथ्वी शाॅने शानदार कामगिरी करत शतकी खेळी केली. वयाच्या अठराव्या वर्षी कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी त्याला मिळाली आहे. पदार्पणाच्या सामन्यात त्याने अत्यंत जबरदस्त खेळी केली.

पृथ्वीने आपले पहिले शतक त्याच्या वडीलांना समर्पित केले आहे. तो फक्त चार वर्षाचा असताना त्याच्या आईचे निधन झाले होते. त्यांनतर त्याचा संभाळ त्याच्या वडीलांनी केला आहे.

सामन्यांनतर बोलताना त्याने सांगितले की ”आपण इंग्लडविरूद्ध खेळण्यासाठी सज्ज होताे. इंग्लडमधील कठीण परिस्थितीत खेळण्याची तयारी आपण केली होती”.

पृथ्वीचा समवेश इंग्लड दौऱ्यात केला होता. परंतु त्याला तिथे पदार्पणाची संधी मिळाली नव्हती.

”इंग्लड दौऱ्यातील माझा अनुभव खुप चांगला होता. या दौऱ्यामुळे मला संघासोबत जुळून घेता आले. संघात कुणी जुनियर आणि कुणी सिनियर नसल्याचे मला विराटने सांगितले होते. ड्रेसिंग रूममधील बहुतांश खेळाडू हे पाच वर्षापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले होते. भारतीय संघातील खेळाडू मित्रासारखे वागले”, असेही पृथ्वी म्हणाला.

महत्वाच्या बातम्या-