उसेन बोल्टच्या कारकिर्दीचा शेवट गोड होणार का ?

आज वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये १*४०० मीटर रिले स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे वैशिष्ठय म्हणजे जमैका संघाकडून शर्यत संपवणारा उसेन बोल्ट आज लंडनच्या ऑलिम्पिक स्टेडियममध्ये आपल्या ऐतिहासिक कारकिर्दीला पूर्णविराम देणार आहे.

उसेन बोल्टची वयक्तिक १०० मीटर शर्यत चर्चेची ठरली मात्र त्याला म्हणावा तास निरोप मिळाला नाही. कांस्य पदकावर समाधान मानावे लागल्यामुळे अनेक बोल्ट चाहते नाराज झाले होते. आज मात्र बोल्टला पुन्हा एकदा सुवर्ण पदक पटकावून म्हणावा तसा शेवट करण्याची संधी आहे.

उसेन बोल्ट सोबतच १०,००० मीटर आणि ५००० मीटरचा राजा असणारा मो फराह देखील आज आपल्या कारकिर्दीतली शेवटची शर्यत पळणार आहे. १०,००० मीटर मध्ये ज्याप्रमाणे फराहने सुवर्ण पदक पटकावत विजय मिळवला त्याचप्रमाणे आज त्याला ५००० मीटरमध्ये सलग ४ विजय मिळवता येईल का यावर सर्वांचे लक्ष असेल.

उसेन बोल्टला जर ही शर्यत जिंकायची असेल तर आपल्या प्रतिस्पर्धी जस्टीन गॅटलिन, ख्रिसटियन कॉलमनपेक्षा सरस कामगिरी करावी लागेल. १०० मीटरच्या अंतिम शर्यतीत गॅटलिन आणि कॉलमन अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय स्थानी होते.

जमैका आणि अमेरिका ही कायम अतितटीची शर्यत होत आली आहे, मात्र सद्द्य स्थिती पाहता अमेरिका उजवी आहे असे म्हणावे लागेल. उसेन बोल्ट हा चमत्कारांसाठी प्रसिद्ध आहे, पण तो आज काही वेगळा करिष्मा करू शकेल का ?

बोल्टच्या सर्वदूर चाहत्यांना बोल्टने सुवर्ण पदक मिळवावे अशीच इच्छा असेल, आता निकाल काय लागतोय हे मात्र आपल्याला रात्रीच कळेल.