हा महान खेळाडू म्हणतो, “स्मिथ आणि वॉर्नर वर एक वर्षाची बंदी हे उपकारच”

ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधार इयान चॅपेल हे क्रिकेट संबधातील प्रकरणावर चर्चात्मक टिप्पणी करण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या मते, चेंडू छेडछाड प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्टिव स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्यावर 12 महिन्यांची बंदी आणून मेहेरबानी केली आहे. तसेच या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या उन्हाळ्यात होणाऱ्या सामन्यांमध्ये गर्दीपासून दूरच राहावे असा सल्लाही दिला आहे.

” सगळेजण त्यांच्यावर आलेली बंदी ही खूप मोठी शिक्षा आहे असे म्हणत आहेत, पण ही शिक्षा त्यांच्यावर दाखवलेली एकप्रकारची दयाच आहे असे चॅपेल यांचे मत आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटला पण वॉर्नर नको आहे, मागच्या वर्षी वॉर्नर आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट प्रशासन मध्ये झालेल्या वादामुळे ते त्याला संघाबाहेर काढण्यासाठी कारणेच शोधत आहेत “, असेही चॅपेल म्हणाले.

74 वर्षीय चॅपेल यांना असे वाटते की,” खेळाडूंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे चेंडू छेडछाडीचे प्रकरण जरा शांत झाले आहे. जेव्हा हे घडले तेव्हा याबद्दलची भावना खूप विरोधाची होती. यामध्ये बदल बॅनक्रॉफ्ट आणि स्मिथ घरी गेल्यामुळे घडून आले. त्या खेळाडूंना त्यांच्या चूकीची जाणीव झाली आहे तसेच ऑस्ट्रेलियामधील भावना पण बदलल्या आहेत “, असेही ते म्हणाले.

” ऑस्ट्रेलियात फसवणूक करणे ही खूप वाईट गोष्ट आहे. आयपीएलचा करार गमावणे याहून क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबतचा करार गमावणे ही खूप मोठी शिक्षा आहे.”

भारतासाठी ही सुवर्ण संधी- इयान चॅपेल

पुढच्या उन्हाळ्यात भारताचा ऑस्ट्रेलियात कसोटी सामन्याचा दौरा आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात हरवण्याची सुवर्ण संधी भारताकडे आहे.

मला वाटते की यामध्ये भारतच जिंकेल पण ऑस्ट्रेलियाची गोलंदाजीही उत्कृष्ट आहे. 20 विकेट्स घेणे हा सामन्याचा कठीण भाग आहे. तसेच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांकडे तेवढ्या धावा शिल्लक राहणार नसल्याने त्यांनी वेस्ट इंडीजच्या अॅण्डी रॉर्बट्स यांच्यासारखा विचार करणे गरजेचे आहे.

आजकाल खेळाडू आयपीएलचे सामने खेळण्यात व्यस्त आहेत. प्रत्येक सामना हा बघण्याजोगा असतो. आयपीएलने खेळासाठी आणि खेळांडूसाठी चांगल्याच गोष्टी केल्या आहेत. यामध्ये वाईट पेक्षा चांगल्या बाबी जास्त आहे, असे मत चॅपेल यांनी व्यक्त केले.