ऑस्ट्रेलियाचे महान कर्णधार इयान चॅपेल करत आहेत त्वचेच्या कर्करोगाचा सामना

ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज कर्णधार इयान चॅपेल यांनी स्पष्ट केले आहे की ते सध्या त्वचेच्या कर्करोगाचा सामना करत आहेत. 75 वर्षीय चॅपेल यांनी पाच आठवडे रेडीएशन थेरपी केली आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून 1964-1980 दरम्यान 75 कसोटी आणि 16 वनडे सामने खेळले आहेत.

त्यांना 1 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ऍशेस मालिकेआधी फिट होण्याची अपेक्षा आहे.

चॅपेल यांनी द डेली टेलिग्राफला सांगितले की ‘जेव्हा तूम्ही 70 वर्षांचे होता तेव्हा तूम्ही तसेही कमजोर होता. पण मागील काही वर्षांपासून मी त्वचेच्या कर्करोगाची सवय झाली आहे. या वयात तूम्ही विचार करता की शेवट जवळ आहे.’

‘मी माझ्या आई जेनीचा मृत्यू पाहिला आहे. त्यामुळे मला वाटते याचा सामना करावाच लागेल. जेव्हा रिची बेनो आणि टोनी ग्रेग गेले तेव्हा मला पून्हा वाटले की ही गोष्ट सर्वांबरोबर होणार आहे. आता मी वाईटातील वाईट स्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहे.’

चॅपेल यांची कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वकालिन दिग्गज कर्णधारांमध्ये गणती होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत कसोटीमध्ये 42.42 च्या सरासरीने 5345 धावा केल्या आहेत. तसेच वनडेमध्ये 48.1 च्या सरासरीने 673 धावा केल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

ज्या न्यूझीलंडला स्टोक्समुळे पराभवाचा सामना करावा लागला त्यालाच मिळणार मोठा पुरस्कार

वाढदिवस विशेष: दुसरा हर्षा होणे नाही..

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारा सहावा भारतीय