आयसीसीचं ट्विटरच्या शब्दमर्यादेबद्दलचं हे मजेशीर ट्विट पाहिलंय का??

पुणे । ट्विटरने परवा ट्विटची शब्दमर्यादा १४०वरून २८० शब्द केली. याचे अनेक स्थरातून स्वागत स्वागत करण्यात आले आहे. खेळ जगताने याचे मोठे स्वागत केले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीच्या ट्विटर अकाउंटवरून चाहत्यांना कायमच महत्वाच्या गोष्टींबरोबर काही मजेशीर गोष्टीही शेअर केल्या जातात. कालही त्यांनी असाच काहीसा खास ट्विट करत चाहत्यांना खुश केले.

शब्दांची मर्यादा वाढवून २८० केल्याबद्दल आयसीसीने एक खास ट्विट केला आहे. ज्यात आयसीसी म्हणते की आम्ही आता २८० शब्द मर्यादा वापरून श्रीलंकेच्या खेळाडूंची आरामात नावे आता लिहू शकतो. ज्यात त्यांनी चामिंडा वास, कुमार धर्मसेना, निरोशन डिकवेलला आणि रांगणा हेराथ यांची संपूर्ण नावे लिहिली आहेत.

या खेळाडूंची संपूर्ण नावे लिहण्यासाठी पूर्वीची शब्द मर्यादा पुरेशी नव्हती.

आयसीसीप्रमाणेच जगातील अनेक क्रिकेट बोर्डाची ट्विटर अकाउंट ही अतिशय कार्यक्षमपणे या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधतात. परंतु क्रिकेटप्रेमींसाठी बीसीसीआयच्या अकाउंटवरून अशा गोष्टी कधीही होत नाही. अतिशय रुक्ष आणि सरकारी कामासारखे हे अकाउंट वापरले जातात. त्यामुळे अनेक वेळा क्रिकेटप्रेमी नाराजी व्यक्त करतात.