आयसीसीने क्रिकेटमध्ये लागू केले हे दोन नवीन नियम

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची वार्षिक बैठक लंडनमध्ये पार पडली आहे. या बैठकीत आयसीसीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये आयसीसीने क्रिकेटमधील काही नियमांमध्ये बदल केला आहे.

यामध्ये षटकांची गती कमी राखल्याने आता कर्णधारावर बंदी न घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याऐवजी संपूर्ण संघांलाच शिक्षा मिळेल. तसेच कर्णधारासह संघांतील सर्व खेळाडूंना सारखाच दंड केला जाईल. असे असले तरी आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या दरम्यान जो संघ षटकांची गती कमी राखेल त्यांचे गुण कापणार आहे.

याआधी जो नियम होता त्यानुसार षटकांची गती कमी राखल्याने कर्णधाराला मॅच फिच्या 50 टक्के दंड आणि अन्य खेळाडूंना 10 टक्के दंड केला जात होता. तसेच तीन सामन्यात असे झाले तर कर्णधारावर बंदी घातली जात होती. पण आता आयसीसीने केलेल्या या नियमाच्या बदलाने कर्णधारांना दिलासा मिळणार आहे.

याबरोबरच आयसीसीने सामना सुरु असताना जर कोणताही खेळाडू चेंडू लागल्याने जखमी झाल्यास बदली खेळाडू संघात सामील करण्याचा नियमही लागू केला आहे. हा नियम 1 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु होणाऱ्या ऍशेस मालिकेपासून लागू होईल.

आयसीसीच्या या नवीन नियमानुसार ज्या प्रकारचा खेळाडू दुखापतग्रस्त होईल तशाच प्रकारचा बदली खेळाडू असायला पाहिजे. म्हणजेच जर गोलंदाज जखमी झाला तर त्याच्याऐवजी दुसरा खेळाडूही गोलंदाजच असायला हवा. या बदलासाठी सामनाधिकाऱ्यांची मंजूरी असणे गरजेचे आहे.

आयसीसीने या नियमाचे परिक्षण 2017 पासून देशांतर्गत क्रिकेटपासून केली होते. यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने महिला आणि पुरुष वनडे आणि बीबीएलमध्ये या नियमाला लागू केले होते.

मागील काही वर्षात सामना सुरु असताना खेळाडूंना चेंडू लागल्याच्या संघाला एक खेळाडू कमी घेऊनच खेळावे लागत असल्याच्या घटना घडल्या आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन आयसीसीने हा नवीन नियम लागू केला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

ऑस्ट्रेलियाचे महान कर्णधार इयान चॅपेल करत आहेत त्वचेच्या कर्करोगाचा सामना

ज्या न्यूझीलंडला स्टोक्समुळे पराभवाचा सामना करावा लागला त्यालाच मिळणार मोठा पुरस्कार

वाढदिवस विशेष: दुसरा हर्षा होणे नाही..