२०२२ राष्ट्रकूल स्पर्धेत क्रिकेटला मिळू शकते स्थान

आयसीसीने 2022ला बर्मिंगघममध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी महिला क्रिकेट टी20 संघाचा समावेश करण्यासाठी अर्ज केला आहे. यासाठी आयसीसीने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डच्या साथीने रितसर अर्ज दाखल केला आहे.

मागील काही वर्षापासून क्रिकेटचा राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये समावेश करण्याची चर्चा सुरू होती त्याला आयसीसीचे कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी पूर्णविराम दिला आहे.

क्रिकेटला जगात मोठा चाहतावर्ग आहे. तसेच महिला क्रिकेटचा विस्तार होण्यास मदत व्हावी यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असे रिचर्डसन म्हणाले.

1998ला कुआला लुंपामध्ये क्रिकेटने पहिल्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा संघ या स्पर्धेत पहिल्या स्थानावर होता.

तसेच आयसीसी ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा सहभाग करण्यास उत्सुक आहे. 1900च्या पॅरीस समर ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदा क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर मात्र ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला नाही. यासाठीही आयसीसी प्रयत्न करत आहेत.

त्यामुळे आयसीसीचा हा अर्ज मान्य झाल्यास तब्बल 24 वर्षानंतर क्रिकेट राष्ट्रकुल स्पर्धेत दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

अबब ! कसोटी क्रिकेटमध्ये आज घडला अजब कारनामा

तो खास विक्रम करण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला पहावी लागणार पुढच्या वर्षाची वाट

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- दुर्दम्य इच्छाशक्तीचा ‘बाला-ली’