टॉप १० भारत- पाकिस्तान क्रिकेट आठवणी

उद्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ चा सामना होणार आहे. भारत हा संघ आयसीसीच्या सर्वच विश्वचषक स्पर्धांमध्ये पाकिस्तानपेक्षा सरस राहिला आहे. परंतु चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ती गोष्ट भारताला मोठ्या प्रमाणावर सध्या करता आलेली नाही. भारत पाकिस्तान म्हटलं की चाहत्यांमध्ये कायमच एक मोठी उत्सुकता असते. त्यामुळे या दोन संघातील झालेल्या सर्व सामन्यांच्या आठवणी चाहते कधी विसरू शकत नाहीत. अशाच काही आठवणी आपल्यासाठी

भारताने शारजा जिंकला
भारत आणि शारजा एक वेगळं नातं. परंतु पाकिस्तान आणि भारत यांच्यात शारजामध्ये कायमच पाकिस्तानच वर्चस्व राहील आहे. २२ मार्च १९८५ रोजी झालेल्या सामन्यात पाकिस्तान संघाने भारताला १२५ धावांत गुंडाळले. त्यात इम्रान खानने १४ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या. १२६ धावांच जिंकण्यासाठीच लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तान संघाला तरीही हार पत्करावी लागली. ३१ वर १ विकेट असताना पाकिस्तानचा डाव ८७ धावांवर संपुष्ठात आला.

शेवटच्या चेंडूवर षटकार
आजकाल शेवटच्या चेंडूवर षटकार मारणं तस नवीन राहील नाही. परंतु जावेद मियाँदादने त्यावेळी चेतन शर्माला असा काही षटकार शेवटच्या चेंडूवर मारला होता कि त्याचा आवाज संपूर्ण जगाने ऐकला. १८ एप्रिल १९८६ रोजी भारताने २४६ धावांच लक्ष शारजामध्येच पाकिस्तानसमोर ठेवलं होत. त्या धावसंख्येचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना मियाँदादने शेवटच्या चेंडूवर चेतन शर्माला षटकार खेचला होता.