ऍंजेलो मॅथेज पहिल्या सामन्याला मुकणार ?

श्रीलंका संघाचा चॅम्पियन्स ट्रॉफी मधील पहिला सामना ३ जूनला शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार असून या सामन्याला श्रीलंकेचा कर्णधार दुखापतीमुळे मुकणार असे दिसून येत आहे. जर असे झालेच तर उपुल तरंगा जो की सध्या श्रीलंकेचा उपकर्णधार आहे संघाचे नेतृत्व करेल.

श्रीलंका संघाच्या व्यवस्थपणाने सांगितले, ” ऍंजेलोला पायात ताण आणि वेदना जाणवत होत्या, त्यामुळे त्याने संघ व्यवस्थापनाकडे क्ष – किरणोत्सर्गी चाचणीची मागणी केली, ज्यात आम्हाला असे कळले कि त्याच्या पायाच्या स्नायूवर ताण आला आहे. त्याच्यावर आता उपचार सुरु आहेत, पण बहुतेक तरी त्याला पहिल्या सामन्यात खेळता येणार नाही.”

ऍंजेलो पहिला सामना न खेळणे हा श्रीलंकेसाठी एक मोठा झटका आहे, ऍंजेलो हा फक्त एक फलंदाज नसून तोच एक गोलंदाजही आहे. त्याच्या अष्टपैलू खेळाची उणीव पहिल्या सामन्यात श्रीलंकेला भासणार हे नक्की. तो सध्या चांगल्या फलंदाजीच्या लयमध्ये आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सराव सामन्यात ९५धावांची खेळी केली आहे. न्यूझीलँड विरुद्धचा दुसरा सराव सामना मात्र त्याला खेळता आला नाही.