आयसीसीकडून मोठी घोषणा, आता होणार कसोटी चॅम्पियनशिपबरोबर

आयसीसीने कसोटी चॅम्पियनशिप आणि वनडे क्रिकेट लीगची घोषणा केली आहे. यामुळे जागतिक क्रिकेटमधील स्पर्धा आयोज़नात मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत.

कसोटी चॅम्पियनशिपमध्ये पहिले ९ संघ हे ६ कसोटी मालिका खेळणार आहेत. त्यात ३ मालिका घराच्या मैदानावर तर ३ परदेशात होणार आहेत. याची सुरुवात २०१९ च्या विश्वचषकानंतर होणार आहे.

ज्या दोन देशात मालिका होईल त्यांना कमीतकमी २ आणि जास्तीतजास्त ५ कसोटी सामने खेळता येतील. यात झिम्बाब्वे . अफगाणिस्तान आणि आयर्लंड देशांचा समावेश नसेल.

वनडे लीग २०२० पासून सुरु होईल. यात १३ संघ सहभागी होतील. १२ संघ हे आयसीसीचे पूर्णवेळ सदस्य असतील तर १ संघ हा आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग चॅम्पियनशिपमधील विजेता असेल. यात भाग घेणाऱ्या आणि चांगली कामगिरी करणाऱ्या संघाना थेट विश्वचषकात स्थान देण्यात येणार आहे.

२०२३ पूर्वी ही लीग दोन वर्षात खेळवली जाईल तर त्यानंतर ती तीन वर्ष खेळवली जाईल. त्यात एक संघ घराच्या मैदानावर ४ आणि परदेशात ४ अशा ८ मालिका खेळेल. यात जास्तीतजास्त ३ सामने खेळवता येतील.