विश्वचषक २०१९- क्रिकेटप्रेमींसाठी ही आहे सर्वात सुखद बातमी

मुंबई | टीम इंडियातील अष्टपैलू खेळाडू केदार जाधव फिट झाला असल्याचे मोठे वृत्त काही माध्यमांनी दिले असून तो भारतीय संघासोबत २२ मे रोजी रवाना होऊ शकतो.

चेन्नई विरुद्ध किंग्ज ११ पंजाब यांच्यातील साखळी सामन्यात केदार दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर तो इंग्लंडला जाणार की नाही हा मोठा प्रश्न  निर्माण झाला होता.

मुंबई मिररमधील एका वृत्तानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघाचे फिजीओ पॅट्रीक फर्हाट यांना तातडीने मायदेशी बोलवुन घेतले होते. तसेच केदार जाधवच्या दुखापतीमध्ये कशा सुधारणा होत आहे यावर लक्ष द्यायला सांगतिले होते. ते ऑस्ट्रेलिया देशात होते. त्यांनी केदारच्या फिटनेसबद्दल सकारात्मक रिपोर्ट दिला आहे.

३४ वर्षीय केदारने ५९ वनडे सामन्यांत ११७४ धावा केल्या असून २०१४मध्ये श्रीलंका संघाविरुद्ध ३०व्या वर्षी वनडे पदार्पण केले होते.

३०मे रोजी विश्वचषकाला सुरुवात होणार असून भारताचा पहिला सामना ५ जून रोजी आहे. त्यामुळे केदारला दुखापतीमधून सावरायला बराच वेळ मिळणार आहे.

परंतु त्यापुर्वी भारत २५ मे रोजी न्यूझीलंड तर २८ मे रोजी बांगलादेश सोबत सराव सामना खेळणार आहे.

विश्वचषकातील सर्वात चर्चित लढत अर्थात भारत पाकिस्तान सामना १६ जून रोजी होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.