आयसीसी महिला चॅम्पियनशिप स्पर्धा जाहीर!

0 222

आयसीसीने आज चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन जाहीर केले आहे. यावर्षी झालेल्या महिला विश्वचषकाला मिळालेला पाठिंबा बघून आयसीसीने चॅम्पियनशिप स्पर्धा जाहीर केली आहे. या महिन्यापासून ही स्पर्धा सुरु होणार आहे.

यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेने खूप विक्रम केले होते. महिला क्रिकेटला पहिल्यांदाच एवढा प्रेक्षक वर्ग मिळाला आहे. दूरदर्शनवरही थेट प्रक्षेपण करण्यात आल्यामुळे प्रेक्षकवर्ग सामने बघण्याकडे खेचला गेला आणि यामुळे महिला क्रिकेटला चालना मिळाली. जवळ जवळ १०० मिलियनपेक्षा जास्त प्रेक्षक दूरदर्शनला भेटले. तर लॉर्ड्सच्या मैदानावर अंतिम सामना पाहायला आलेले प्रेक्षकांची संख्या होती २६,५०० इतकी आणि सर्वात जास्त प्रेक्षक वर्ग भारतात भेटला भारतीय जनतेने दूरदर्शनवर भरपूर पाठिंबा दिला.

हे सगळे लक्षात घेत आयसीसीने महिला क्रिकेट असाच प्रकाशझोतात राहावा यासाठी प्रयत्न करणे चालू केले आहे. कारण नोव्हेंबर २०१८ पर्यंत आयसीसीची कोणतीही स्पर्धा होणार नव्हती. थेट नोव्हेंबर २०१८ला टी२० विश्वचषक होणार आहे. त्यामुळेच त्याच्या आधी आयसीसीने चॅम्पियनशिपची घोषणा केली. ही स्पर्धा ८ देशांमध्ये होणार आहे.

ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड,पाकिस्थान, विंडीज, न्यूझीलंड,दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या ८ देशात ही स्पर्धा होणार आहे. ह्या स्पर्धेत प्रत्येक देश एकमेकांविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळेल.

ही स्पर्धा २०२१मध्ये न्यूझीलंडला होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी पात्रता फेरी म्हणूनही असेल. न्यूझीलंडला होणाऱ्या विश्वचषकात न्यूझीलंडला थेट प्रवेश आहे. आता या महिन्यात सुरु होणाऱ्या चॅम्पिअनशिप स्पर्धेतून सर्वोत्कृष्ट ३ संघ २०२१च्या विश्वचषकात थेट प्रवेश करतील. राहिलेल्या संघांना विश्वचषक पात्रता स्पर्धेत खेळून आपली पात्रता सिद्ध करावी लागेल.

Comments
Loading...
%d bloggers like this: