काल टीम इंडिया पराभूत झाली, आज कुलदीपला मिळाली ही गुड न्यूज

हॅमिल्टन | भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेत भारताला २-१ असे पराभवाला सामोरे जावे लागले. मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताला केवळ ४ धावांनी पराभूत व्हावे लागले. 

यामुळे प्रथमच टीम इंडियाला दुहेरी तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. गोलंदाजीच्या आघाडीवर संघाने केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे संघाला या मालिकेत पराभव पहावा लागला.

असे असले तरी टीम इंडियाने आयसीसी गोलंदाजी टी२० क्रमवारीत दुसरे स्थान कायम राखले आहे. तर दुसऱ्या बाजूला कुलदीप यादवने क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम अर्थात दुसरे स्थान पटकावले आहे.

कुलदीपने शेवटच्या सामन्यात २६ धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्या. याचाच फायदा कुलदीपला झाला आहे.

या संपुर्ण दौऱ्यात कुलदीपला एकाच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. यात त्याने कालच्या सामन्यात टीम सेफर्ट आणि काॅलिन मुन्रोला बाद केले.

गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानी अफगाणिस्तानचा गोलंदाज राशिद खान आहे. कुलदीपशिवाय अन्य कोणताही गोलंदाज टाॅप १०मध्ये नाही. युझवेंद्र चहलची ६ स्थानांची घसरण होत तो १७व्या स्थानावर गेला आहे.

रोहित शर्माला तीन स्थानांचा फायदा झाला असून तो ७व्या स्थानावर आला आहे. तर केएल राहुलला ३ स्थानांचे नुकसान झाले असून तो १०व्या स्थानावर आहे. फलंदाजीत शिखर धवन ११व्या स्थानावर कायम असून विराटची घसरण होऊन तो १९व्या स्थानावर फेकला गेला आहे.

अष्टपैलू खेळाडूंमध्ये टाॅप २० मध्ये केवळ सुरेश रैना हा एकमेव खेळाडू आहे. तो २०व्या स्थानी आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

असा राखला माहीने भारतीय ध्वजाचा मान, पहा व्हिडीओ

हार्दिक पंड्याची जर्सी रोहित शर्माला फिट तरी कशी बसते?

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेत ४ भारतीय गोलंदाजांची शतके

आजचा दिवस धोनीचाच! विद्युत वेगाने केलेली स्टंपिंग पहाच

…आणि हातात ग्लव्ज घालताच धोनीच्या नावावर दिवसातील दुसरा तर कारकिर्दीतील सर्वात मोठा कारनामा