आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपमध्ये सध्या कुणाचे किती आहेत गुण?

रविवारी(18 ऑगस्ट) श्रीलंकेने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. तसेच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघातील ऍशेस मालिकेतील दुसरा सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे आता रविवारी संपलेल्या या सामन्यांनंतर आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमधील गुणतालिकेत श्रीलंका अव्वल स्थानावर आली आहे.

श्रीलंनेकेने न्यूझीलंड विरुद्ध 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत विजय मिळवल्यामुळे त्यांचे आता कसोटी चॅम्पियनशिपमध्ये 60 गुण झाले आहेत.

श्रीलंका पाठोपाठ या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया असून त्यांचे 32 गुण आहेत. ऑस्ट्रेलियाला इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या ऍशेस मालिकेतील पहिला सामना जिंकल्याने 24 गुण मिळाले होते. तर दुसरा सामना अनिर्णित राहिल्याने त्याचे 8 गुण मिळाले. असे मिळून त्यांचे 32 गुण झाले आहेत.

त्याचबरोबर इंग्लंडला ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या सामन्यानंतर पराभवामुळे एकही गुण मिळाला नव्हता. पण दुसरा सामना अनिर्णित राहिल्याने त्यांना 8 गुण मिळाले आहेत. त्यामुळे ते या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.

न्यूझीलंडचे मात्र श्रीलंकेविरुद्ध पराभूत झाल्यामुळे शून्य गुण आहेत. या चार संघांव्यतिरिक्त अजून अन्य संघांच्या कसोटी चॅम्पियनशीपच्या सामन्यांना सुरुवात झालेली नाही. येत्या 22 ऑगस्टपासून वेस्ट इंडीज आणि भारत हे दोन संघ कसोटी चॅम्पियनशीपला सुरुवात करणार आहेत.

असे दिले जाणार कसोटी चॅम्पियनशीपमध्ये गुण – 

ही चॅम्पियनशीप स्पर्धा आयसीसीचे कसोटी सदस्य असणाऱ्या 12 देशांपैकी 9 देशांच्या संघात पार पडणार आहे. यामध्ये भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि वेस्ट इंडीज या 9 देशांचा समावेश आहे.

तसेच 9 संघांना प्रत्येकी 8 प्रतिस्पर्ध्यांपैकी 6 संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळाव्या लागणार आहे. यामध्ये तीन मालिका घरच्या मैदानावर तर तीन मालिका परदेशात खेळायच्या आहेत. या मालिका 2 ते 5 सामन्यांच्या असतील.

या चॅम्पियशीपमध्ये होणाऱ्या प्रत्येक मालिकेसाठी एकूण 120 गुण असतील. म्हणजेच जर दोन सामन्यांची मालिका असेल तर या मालिकेतील एक सामना जिंकणाऱ्या संघाला 60 गुण मिळतील.

पण सामना जर अनिर्णित राहिला तर दोन्ही संघाला प्रत्येकी 20 गुण आणि जर बरोबरी झाली तर दोन्ही संघाला प्रत्येकी 30 गुण दिले जातील. पराभूत होणाऱ्या संघाला एकही गुण मिळणार नाही

जर मालिका 3 सामन्यांची झाली तर एका सामन्यात जिंकणारा संघ 40 गुण मिळवेल. तर अनिर्णित झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 13 गुण आणि बरोबरी झाली तर दोन्ही संघांना प्रत्येकी 20 गुण दिले जातील.

या कसोटी चॅम्पियनशिपमध्ये साखळी फेरीनंतर ज्या दोन संघांचे सर्वाधिक गुण असतील या दोन संघात जून 2021 मध्ये लॉर्ड्सवर अंतिम सामना पार पडेल.

असे मिळतील गुण-

Screengrab: icc-cricket.com

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

सोशल मीडियावरील विराटच्या फाॅलोवर्सचा आकडा ऐकून अवाक व्हालं!

असं काहीतरी करा, सौरव गांगुलीचे जगातील संघांना चॅलेंज

पुढच्या वनडे मालिकेत हा खेळाडू खेळणार चौथ्या क्रमांकावर, शास्त्रींचा मोठा खुलासा