मेलबर्न कसोटीतील विजयामुळे टीम इंडियाला झाला मोठा फायदा

मेलबर्न। भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रविवारी(30 डिसेंबर) 137 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यातनंतर भारतीय संघाने आयसीसी कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान आणखी भक्कम केले आहे.

त्याचबरोबर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध 423 धावांनी विजय मिळवत आयसीसी क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेला मागेल टाकत तिसरे स्थान मिळवले आहे.

या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर 108 गुणांसह इंग्लंड असून भारत 116 गुणांसह अव्वल स्थानी आहे. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतल्याने भारताला आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतील स्थान भक्कम करण्यात मदत झाली आहे.

तसेच न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशी जिंकल्याने त्यांनी 107 गुण मिळवत 106 गुण असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला मागे टाकले आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेलाही आयसीसी क्रमवारीत प्रगती करण्याची संधी आहे.

सध्या त्यांची पाकिस्तान विरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला आहे. तसेच त्यांनी जर पाकिस्तानला 3-0 असे पराभूत केले तर ते 110 गुणांसह दुसऱ्या स्थानावर येऊ शकतात.

तसेच त्यांनी ही मालिका 2-0 अशी जरी जिंकली तरी ते 108 गुण मिळवून इंग्लंडला दशांश गुणांच्या फरकाने मागे टाकत दुसरे स्थान मिळवू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या:

-‘बाप’माणूस रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर

भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटवर प्रश्न उभा करणाऱ्यांना कर्णधार कोहलीने दिले सडेतोड उत्तर, पहा व्हिडिओ

कमी सामन्यात कर्णधार राहुन कोहली विक्रमांत धोनी- गांगुलीच्या पुढे