आता होणार कसोटी क्रिकेटचा विश्वचषक

वेलिंग्टन: येथे झालेल्या आयसीसीच्या बैठकीत खूप काळ चर्चेत राहिलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला मान्यता देण्यात आली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जगातील सर्व कसोटी खेळणारे देश असणार आहेत. ही कसोटी क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यासाठी एक मोठी गोष्ट ठरणार आहे.

टी२० च्या लोकप्रियतेमुळे क्रिकेटचा उउदय जेथून झाला तो फॉरमॅट म्हणजे कसोटी क्रिकेट कालबाहय होतो की काय असे अनेक क्रिकेट पंडितांना वाटू लागले होते. युवा खेळाडू आणि प्रेक्षकांनाही हे झटपट क्रिकेटच जास्त आवडत आहे असे दिसून येत होते.

२०१०पासून या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची चर्चा चालू होती. सिडनी मॉर्निंग हेरल्डनेमधील एका वृत्तानुसार नऊ देशांची कसोटी चॅम्पियनशिपची योजना आता करण्यात येणार आहे आणि आयसीसीने शुक्रवारी ऑकलंडमध्ये एका बैठकीत या संकल्पनेला हिरवा कंदील दाखवला.

स्पर्धेची सुरुवात २०१९ मध्ये होईल व संपूर्ण स्पर्धा पूर्ण होण्यासाठी दोन वर्ष लागतील. तसेच अंतिम सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळला जाईल. प्रत्येक आंतरराष्ट्रीय कसोटी ही या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असेल.