आयसीसीने केले विराट कोहलीला माइक ड्रॉप प्रकरणावरुन ट्रोल

बर्मिंगहॅम। भारताला एजबस्टन मैदानावर पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी (शनिवार, ४ आॅगस्ट) ३१ धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे.

या सामन्यात भारताच्या पराभवाबरोबरच भारताचा कर्णधार विराट कोहलीने जो रुटला धावबाद केल्यानंतर सेलिब्रेशन करताना बॅट ड्रॉपसारखे हावभाव केले, त्याची सोशल मिडियावर खूप चर्चा झाली.

त्यामुळे आता आयसीसीनेही विराटला या प्रकरणावरुन ट्रोल केले आहे. आयसीसीने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात विराट आणि रुट संभाषण करत आहेत आणि रुटच्या हातातून माइक खाली पडत आहे.

तसेच आयसीसीने या फोटोला ‘रुट आउट’ असे कॅप्शन दिले आहे.

आयसीसीने जरी विराटला ट्रोल केले असले तरी विराट चाहत्यांनी आयसीसीवर टीका केली आहे. आयसीसीच्या या पोस्टवर चाहत्यांच्या अनेक कमेंट आल्या आहेत.

https://twitter.com/vinaykumarpurra/status/1025988861518741504

काय आहे हे माइक ड्राॅप ते बॅट ड्राॅप प्रकरण-

भारत विरुद्ध इंग्लंड संघात लीड्सवर झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात शतक साजरे केल्यावर जो रुटने बॅट ड्रॉप सेलिब्रेशन केले होते. त्याने हातातील बॅट हवेत आडवी उंच नेऊन खाली सोडून दिली होती.

विशेष म्हणजे त्याने ही कृती कोहलीसमोर केली होती. याची मोठी चर्चा सोशल मिडियावर तेव्हा झाली होती. ही वनडे मालिका इंग्लंड २-१ने जिंकला होता.

त्यामुळे इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात रुट ८० धावांवर खेळत असताना कोहलीने त्याला धावबाद केल्यावर सेलिब्रेशन करताना प्रथम फ्लाइंग किस दिला आणि लगेच बॅट ड्रॉपसारखे हावभाव केले. यावेळी तो माइक ड्राॅप असे म्हणताना कॅमेऱ्यावर स्पष्ट दिसले.

बॅट ड्राॅप सेलिब्रेशन म्हणजे नक्की काय- 

जेव्हा एखादा मोठा गायक मोठ्या कान्सर्टमध्ये परफार्म करतो तेव्हा शेवटी तो माइक हवेतून जमिनीवर सोडतो. याला माइक ड्राॅप असे म्हटले जाते. अगदी काही देशांच्या नेत्यांनीही आपल्या शेवटच्या भाषणानंतर माइक ड्राॅप सेलिब्रेशन केले आहे.

यावरुन प्रेरीत होत जो रुटने जेव्हा वनडे मालिकेत शतक केले तेव्हा बॅट ड्राॅप सेलिब्रेशन केले. विशेष म्हणजे त्याने याबद्दल नंतर माफी मागितली तसेच माझ्याकडून ते अनवधानाने झाले असेही सांगितले होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

वाढदिवस विशेष: माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद बद्दल या ५ गोष्टी माहित आहेत का?

बापाने १९८३ ला तर मुलाने २०१८ला टीम इंडीयाला दिला त्रास

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप: पीव्ही सिंधूला सलग दुसऱ्यांदा रौप्यपदक!