आयसीसीनेही घेतली अर्जुन तेंडूलकरच्या संघनिवडीची दखल

7 जूनला अर्जुन तेंडूलकरची 19 वर्षाखालील भारतीय संघात श्रीलंका दौऱ्यातील चारदिवसीय सामन्यांसाठी निवड झाली आहे. याची आयसीसीनेही खास दखल घेतली आहे.

बऱ्याचदा आयसीसी 19 वर्षाखालील क्रिकेटच्या मोठ्या स्पर्धांचीच फक्त दखल घेते. तसेच 19 खालील संघात कोणत्या खेळाडूची निवड झाली किंवा कोणत्या देशाचा संघ निवडला गेला तर आयसीसी त्याबद्दल सहसा काही प्रसिद्ध करत नाही.

परंतू अर्जुनच्या बाबतीत मात्र आयसीसीने दोनदा ट्विट करून त्याची दखल घेतली आहे. पहिल्या ट्विटमध्ये आयसीसीने त्याच्या निवडीची ब्रेकिंग न्यूज टाकली आहे. तर दुसरा ट्विटमध्ये त्यांनी अर्जुनच्या बातमीची लिंक टाकली आहे.

या लिंक बरोबरच आयसीसीने ट्विटमध्ये म्हटले आहे की ” सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुनची १९ वर्षाखालील भारतीय संघात पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यातील चारदिवसीय सामन्यांसाठी निवड झाली आहे.”

अर्जुन हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मुलगा असल्याने त्याच्या १९ वर्षाखालील भारतीय संघातील निवडीने सर्वांचे लक्ष वेधले आहे, असेच आयसीसीने अर्जुनबद्दल केलेल्या ट्विटमधून दिसून आले आहे.

विशेष म्हणजे आयसीसीने टाकलेल्या दुसऱ्या ट्विटवर इंग्लंड महिला संघाची क्रिकेटपटू डॅनिएल वॅटनेही कमेंट केली आहे.

19 वर्षाखालील भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यात श्रीलंकेविरूद्ध 2 चारदिवसीय आणि 5 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

फिफा विश्वचषक २०१८- ओळख क गटाची

या मोठ्या खेळाडूची झाली बांग्लादेशच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

केवळ या ५ कारणांमुळे झाली अर्जून तेंडूलकरची भारतीय संघात निवड

मुंबई रणजी क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद समीर दिघे यांचा राजीनामा

मुंबई रणजी क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद समीर दिघे यांचा राजीनामा