जाणून घ्या किती प्रेक्षकांनी पाहिला महिला विश्वचषक !

नुकताच पार पडलेला महिलांचा विश्वचषक हा जवळ जवळ २० कोटी लोकांनी पहिला आहे. भारताने या विश्वचषकाचा अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध फक्त ९ धावांनी हरला होता. भारतात १५ कोटी लोकांनी ही स्पर्धा पाहिली. त्यातील फक्त अंतिम सामन्यासाठी १० कोटी पेक्षा जास्त प्रेक्षक होते. भारतीय महिलांनी या स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आणि त्यामुळेच या स्पर्धेच्या प्रेक्षकांमध्ये ५००% ने वाढ झाली. २०१३ मधील विश्वचषकापेक्षा ३०० % अधिक प्रेक्षक या स्पर्धेला लाभले.

इंग्लंडमध्ये ही अंतिम सामन्याला खूप टीव्ही प्रेक्षक भेटले. अगदी पुरुष क्रिकेटपेक्षाही जास्त. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियात महिला विश्वचषक पाहण्याच्या तासांमध्ये १३१ टक्क्यांनी वाढ झाली आणि दक्षिण आफ्रिकेत या स्पर्धेची लोकप्रियता ८६१% इतकी वाढली.

आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन म्हणाले की, “आम्ही महिला विश्वचषकाच्या वाढत्या लोकप्रियतेने आनंदी आहोत. आम्हाला असे वाटायचे की महिला क्रिकेटमध्ये ही वेळ योग्य आहे आणि आम्ही हा खेळ शक्य तितक्या जास्त प्रेक्षकांना पर्यंत पोहचवला पाहिजे आणि आता आकडे हे दर्शवतात की आम्ही बरोबर होतो. ”

ट्विटरवर १० लाख लोकांनी #WWC17 हा हॅशटॅग वापरून ट्विट केले. हा आतापर्यंतचा २०१७ मधील हा कुठल्या ही महिला खेळासाठीचा विक्रम होता. #WWC17Final हा हॅशटॅग सर्वाधिक वेळा आतापर्यंतच्या कोणत्याही महिला खेळाच्या अंतिम सामन्यासाठी वापरण्यात आला होता.

महिला विश्वचषक २०१७ बद्दल वर्तमानपत्रात आणि ऑनलाईनमध्ये ५०,००० हुन अधिक लेख छापण्यात आले. त्यातील भारत १६,००० तर इंग्लंडमध्ये १४,००० आणि ऑस्ट्रेलियामध्ये ९,००० लेख लिहिण्यात आले.