महिला टी२० विश्वचषक: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी अशी आहे टीम इंडिया

गयाना। महिला टी20 विश्वचषक 2018 स्पर्धेत आज(11 नोव्हेंबर) भारत विरुद्ध पाकिस्तान संघात दुसरा सामना पार पडणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारताच्या 11 जणींच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

भारताने या स्पर्धेतील पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध 34 धावांनी जिंकला आहे. तर पाकिस्तानला आॅस्ट्रेलिया विरुद्ध 52 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे या सामन्यातून भारतीय संघ विजयी लय कायम ठेवण्यासाठी तर या पाकिस्तानचा संघ या स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्यासाठी आतुर असेल.

भारतीय महिला संघ विरुद्ध पाकिस्तान महिला संघ यांच्यात आत्तापर्यंत 11 टी20 सामने झाले आहेत. यांपैकी 8 सामने भारताने तर 2 सामने पाकिस्तानने जिंकले आहेत.

असा आहे 11 जणींचा भारतीय महिला संघ- हरमनप्रीत कौर(कर्णधार), तानिया भाटिया, स्म्रीती मानधना, जमिमा रोड्रिगेज, दयालन हेमलता, वेदा कृष्णमुर्ती, मिताली राज, दिप्ती शर्मा, राधा यादव, अरुंधती रेड्डी, पुनम यादव.

असा आहे 11 जणींचा पाकिस्तान महिला संघ- जावेरीया खान (कर्णधार), नहिदा खान, आयशा जफर, ओमीमा सोहेल, बिस्माह मारूफ, निदा दार, अलीया रियाझ, सना मीर, डायना बेग, सिद्रा नवाज, अनम अमीन

महत्त्वाच्या बातम्या:

ISL 2018: गोवा संघाच्या बचावातील त्रुटींचा फायदा घेण्याचा ब्लास्टर्सचा प्रयत्न

ISL 2018: व्हिएराच्या गोलमुळे एटीकेची पुणे सिटीवर मात

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १४- परिपूर्णतेचा ध्यास घेतलेला शापित