टाॅप ३- या भारतीय खेळाडूंचा 2019चा विश्वचषक ठरणार शेवटचा विश्वचषक!

एकदिवसीय क्रिकेट  विश्वचषकाला आता एक वर्षापेक्षा कमी काळ राहिला आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या 2019 च्या विश्वचषकात दहा संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघाची अलिकडील काळातील कामगिरी पाहता या विश्वचषकाच्या विजेतेपदासाठी भारत प्रमुख दावेदार असेल.

या विश्वचषकात भारताकडून आपला पहिला विश्वचषक खेळण्यासाठी के एल राहुल, हार्दीक पंड्या, जसप्रीत बुमराह हे सज्ज आहेत. तर दुसरीकडे वयाची तीशी पार केलेल्या खेळाडूंचा हा शेवटचा विश्वचषक असू शकतो.

या लेखात शेवटचा विश्वचषक खेळणाऱ्या सांभाव्य खेळडूंचा आढावा घेतलेला आढावा-

1. महेंद्र सिंग धोनी

महेंद्र सिेंग धोनी 2019 विश्वचषक त्याच्या कारकिर्दीतला चौथा विश्वचषक असेल. यापूर्वी धोनीने 2007 राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली कारकिर्दीतला पहिला विश्वचषक खेळला होता. त्यानंतर त्याने 2011 आणि 2015 विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करत 2011 विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून दिले.

36 वर्षीय धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत एकदिवसीय आणि टी-20 कर्णधार पदावरून पायउतार झाला असला तरी त्याची 2019 विश्वचषकात भारतीय संघाची जागा नक्की आहे.

2023 साली धोनीचे वय 40 असेल त्यामुळे पुढच्या विश्वचषकापूर्वी धोनी कदाचीत निवृत्त झालेला असेल.

धोनीने 318 एकदिवसीय सामन्यात 51.38 च्या सरासरीने 9967 धावा केल्या आहेत.

2. रोहित शर्मा

सध्याच्या काळातील सर्वोत्तम सलामिवीर रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमधिल सर्वोतकृष्ट खेळाडू म्हणून क्रिकेट जगतावर आपला ठसा उमठवला आहे. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन वेळा द्विशतके करून त्याने ते सिद्धही केले आहे.

2019 विशवचषकात रोहितची कामगिरी भारतासाठी महत्वाची ठरणार आहे. त्याचा वरच्या फळीतील अनुभव भारतीय फलंदाजीची ताकद असेल.

रोहितने त्याच्या कारकिर्दीतील 180 एकदिवसीय सामन्यात 44.55 च्या सरासरीने 6594 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन द्विशतके, सतरा शतके आणि 34 अर्धशतकांचा समावेश आहे.

इंग्लंडमधिल विश्वचषकात त्याचे भारतीय संघातील स्थान नक्की आहे. मात्र 31 वर्षीय रोहितचा पुढच्या विश्वचषकातील सहभाग त्याच्या कामगिरी व शारीरिक तंदुरूस्तीवर अवलंबून असेल.

3.शिखर धवन

2015 विश्वचषकात भारताकडून शिखर धवनने सर्वाधिक 412 धावा केल्या होत्या. 2019 विश्वचषकातही भारतीय संघासाठी शिखर धवनची भूमिका महत्वाची असेल. रोहित शर्माच्या जोडीने त्याने गेल्या तीन वर्षापासून सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. धवनने 2013 पासून कसोटी  क्रिकेटमध्येही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.

हा विश्वचषक शिखर धवनचा शेवटचा विश्वचषक असू शकतो. 33 वर्षीय धवनाचे वय 2023 साली 37 असेल. तसेच संघात स्थान टिकवण्यासाठी नव्या खेळाडूंशी स्पर्धा यांचा विचार करता त्याची 2023 विश्वचकात निवड होने एकंदरीतच अवघड आहे.

शिखर धवनने 102 एकदिवसीय सामन्यात 45.91 च्या सरासरीने 4361 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 13 शतक आणि 25 अर्धशतकांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

फक्त आणि फक्त फिटनेससाठी धोनीने केला प्राणाहुन प्रिय गोष्टीचा त्याग

इंग्लंड क्रिकेटच्या चाहत्यांमुळे अाॅस्ट्रेलियन खेळाडू वैतागले

बापरे! क्रिकेटमध्ये घडला तब्बल ११८वर्षांमधील सर्वात मोठा विक्रम, भारतीय झाले त्याचे साक्षीदार