म्हणून धोनीला होऊ शकते शिक्षा !

रांची । भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि जागतिक क्रिकेटमध्ये आपल्या वेगळ्या यष्टिरक्षणासाठी प्रसिद्द असणाऱ्या एमएस धोनीला आयसीसीच्या नवीन नियमांचा फटका बसू शकतो. धोनी यष्टिरक्षण करताना ज्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, ज्यासाठी जगातील दिग्गज धोनीचं कौतुक करतात त्याच गोष्टीला आयसीसीने नियम क्रमांक ४१.५ प्रमाणे अवैध ठरवले आहे.

काय आहे ४१.५ नियम

एकदा स्ट्राइकवर असणाऱ्या खेळाडूने चेंडू खेळला की त्यानंतर क्षेत्ररक्षण करत असलेल्या खेळाडूने जर शाब्दिक किंवा आपल्या कोणत्याही कृतीतून फलंदाजी करणाऱ्या खेळाडूचे लक्ष विचलित केले , अडथळा आणला किंवा फसवणूक केली तर ती क्रिया अवैध ठरवून गोलंदाजी करणाऱ्या संघाला ५ धावांची शिक्षा दिली जाणार आहे.

आयसीसीचे हे नवीन नियम २८ सप्टेंबरपासून लागू करण्यात आले असून भारत विरद्ध ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेसाठी हे नियम लागू नाहीत. परंतु न्यूजीलँड विरुद्धच्या मालिकेसाठी मात्र हे नियम वापरले जाणार आहेत.

बुधवारी समालोचक आणि माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी ह्या नियमावर जोरदार टीका केली होती. आयसीसीने यावर विचार करावा असेही मांजरेकर पुढे म्हणाले. जर फलंदाजाने खोट्या प्रकारे स्टेप आऊट करून फटका खेळला तर त्याला ५ धावांची शिक्षा होणार का? एका ट्विट वर उत्तर देताना ते म्हणाले याला चीटिंग म्हणण्यापेक्षा ट्रिक म्हणतात.

या नियमाचा पहिला बळी ठरला हा क्षेत्ररक्षक-