आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत आदित्य योगी, रिशिता पाटील, तेज ओकचा मानांकित खेळाडूंवर विजय

पुणे । पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत आदित्य योगी, रिशिता पाटील, तेज ओक या खेळाडूंनी आपापल्या गटांतील मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत सनसनाटी निकालाची नोंद केली.

आरपीटीए टेनिस कोर्ट,पाषाण येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत 8वर्षाखालील मिश्र गटात अव्वल मानांकित नामिश हूडने पृथ्वीराज दुधानेचा 5-3असा पराभव केला. आदित्य योगीने सहाव्या मानांकित आयुश पाटीलचा टायब्रेकमध्ये 5-4(6)असा पराभव केला. रिशिता पाटीलने तिसऱ्या मानांकित नीरज जोर्वेकरचा 5-3असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला.

10 वर्षाखालील मुलींच्या गटात वैष्णवी सिंग व रित्सा कोंडकर यांनी अनुक्रमे अनिष्का सुंदराम व नैशा कपूर यांचा 5-2अशा सारख्याच फरकाने पराभव करून आगेकूच केली. दुसऱ्या मानांकित प्रिशा शिंदेने इरा कुंभारचे आव्हान 5-1असे मोडीत काढले. 10 वर्षाखालील मुलांच्या गटात बिगरमानांकीत तेज ओक याने दुसऱ्या मानांकित अर्चित धूतचा 5-1असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: 8वर्षाखालील मिश्र गट: नामिश हूड(1)वि.वि.पृथ्वीराज दुधाने 5-3; रित्सा कोंडकर(4)पुढे चाल वि.स्वस्ती अगरवाल; विहान पटनी वि.वि.राम मगदूम 5-4(5); आदित्य योगी वि.वि.आयुश पाटील(6) 5-4(6); अमीन क्षितिज(7)वि.वि.श्रेय भूतरा 5-2; रिशिता पाटील वि.वि.नीरज जोर्वेकर(3) 5-3; सुजय देशमुख(5)वि.वि.प्रज्ञेश शेळके 5-4(4); आर्यन कीर्तने(2)वि.वि.मिहीर काळे 1-0सामना सोडून दिला;

10वर्षाखालील मुली: वैष्णवी सिंग वि.वि.अनिष्का सुंदराम 5-2; रित्सा कोंडकर(4)वि.वि.नैशा कपूर 5-2; प्रेक्षा प्रांजल वि.वि.साची मुंदडा 5-1; काम्या चोपडा वि.वि.सैशा शिंदे 5-0; काव्या देशमुख वि.वि.ईश्वरी पंडित 5-2; प्रिशा शिंदे(2)वि.वि.इरा कुंभार 5-1;

10वर्षाखालील मुले: सक्षम भन्साळी(1)वि.वि.वर्धन पोतदार 5-0; नील केळकर वि.वि.मल्हार देशपांडे 5-0; अनुज भागवत वि.वि.शुभांकर सिन्हा 5-3; नमिश हूड(7)वि.वि.वेद मोघे 5-3; अवनिश चाफळे(3)वि.वि.प्रज्ञेश शेळके 5-0; रोहन बजाज वि.वि.आरिन गद्रे 5-3;शिवांश कुमार वि.वि.वैष्णव दानावडे 5-0; समिहन देशमुख(5)वि.वि.आदित्य कामत 5-3; अमन शहा वि.वि.विश्वजीत सणस 5-; विहान तिवारी वि.वि.रियान माळी 5-2; पृथ्वीराज हिरेमठ(4)वि.वि.पृथ्वीराज दुधाने 5-2; कार्तिक शेवाळे(6)वि.वि.सुजय देशमुख 5-0; सनत कडाळे वि.वि.शौनक रणपिसे 5-0; श्रीराम जोशी वि.वि.ओंकार किंकर 5-1;तेज ओक वि.वि.अर्चित धूत (2) 5-1.