आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत 80 हुन अधिक खेळाडू सहभागी 

रित्सा कोंदकर, प्रिशा शिंदे, सक्षम भन्साळी यांना अव्वल मानांकन

पुणे: पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित  8 व 10 वर्षाखालील गटातील  आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेच्या चौथ्या मालिकेत शहरातून 80 हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र मंडळ कटारीया हायस्कुल, मुकुंद नगर येथे 21 व 22 सप्टेंबर 2018 रोजी होणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.

खोळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे:

8 वर्षाखालील मिश्र गट- 1. रित्सा कोंदकर, 2. आर्यन किर्तने, 3. सुजय देशमुख, 4. त्रिशीत वाकलकर, 5. क्षितिज अमिन, 6. विर हर्पुडे, 7. पृथ्विराज दुधाने, 8. राम मगदुम

10 वर्षाखालील मुली- 1. प्रिशा शिंदे, 2. मृणाल शेळके, 3. काव्या देशमुख, 4. आरोही देशमुख, 5. काव्या पांडे, 6. वैष्णवी सिंग, 7. तनिशा साने, 8. स्वानीका रॉय

10 वर्षाखालील मुले- 1. सक्षम भन्साळी, 2. निव कोठारी, 3. अर्चित धुत, 4. मनन अगरवाल, 5. शार्दुल खवळे, 6. संमिहन देशमुख, 7. अक्षत दक्षिणदास, 8. देवराज मंदाडे