हा खेळाडू म्हणतो मला आॅस्ट्रेलियाचा कर्णधार करा!

मागील महिन्यात झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणामुळे स्टिव्ह स्मिथला आॅस्ट्रेलियाच्या कर्णधारपदावरून तर डेव्हीड वॉर्नरला उपकर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा नविन कर्णधार कोण याची चर्चा होत आहे. 

आॅस्ट्रेलिया जून महीन्यात इंग्लड विरूद्ध 5 सामन्यांची वनडे मालिका आणि 1 टि20 सामना खेळणार आहे. यासाठी अॅरॉन फिंचनेही मर्यादित षटकांच्या क्रिकेटच्या कर्णधारपदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. त्याने याबद्दल cricket.com.au. शी बोलताना सांगितले की “मी नक्कीच यासाठी तयार आहे पण मी खरचं याबद्दल विचार केलेला नाही.”

तसेच तो पुढे म्हणाला “हा खरचं खूप कठीण काळ आहे. इंग्लड विरूद्धची मालिका आणि पाकीस्तान विरूद्ध दुबईत होणाऱ्या सामन्यांसाठी पुढील काही महीन्यात आॅस्ट्रेलिया संघात काही बदल होणार आहेत.”

“जर मला कर्णधारपदाची संधी मिळाली तर मला आवडेल पण मी याविषयी विचार केलेला नाही.” फिंचने याआधी 2 वनडे सामन्यांमध्ये तर 2014 मध्ये टि20 संघाचे नेतृत्व केले आहे. 

चेंडू छेडछाड प्रकरणानंतर दक्षिण अफ्रिकेच्या विरूद्ध चौथ्या कसोटित टीम पेनने आॅस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते.