आशियाई सुवर्णपदक विजेत्या निरज चोप्राच्या त्या कृत्याबद्दल काय म्हणाले भारतीय लष्कर दलप्रमुख?

एशियन गेम्स सुवर्ण पदक विजेत्या भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने पाकिस्तानी प्रतिस्पर्ध्याबाबत दाखवलेल्या खिलाडूवृत्तीबद्दल भारतीय लष्कर दलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी विधान केले की, “जर पाकिस्तानने आतंकवाद थांबवला तर आम्ही पण नीरज चोप्रासारखे करू”,असे म्हटले आहे.

एशियन गेम्समध्ये पदक विजेत्यांना सन्मानित करण्याच्या कार्यक्रमात रावत बोलत होते.

यावेळी रावत यांना विचारण्यात आले की, भारत-पाक सीमेवर अशा प्रकारची वागणुक मिळते का? यावर रावत म्हणाले, “त्यांनी (पाकिस्तान) पहिले आंतकवाद थांबण्यासाठी पाऊल उचलावे आणि जर त्यांनी तो रोखला तर आम्हीही नीरज चोप्रासारखे वागू.”

एशियन गेम्समध्ये पदक वितरणानंतर नीरजने पाकिस्तानच्या कांस्यपदक विजेत्या भालाफेकपटू अर्शद नदीमसोबत हात मिळवलेला फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलाच वायरल झाला आहे.

तसेच नुकतेच झुरीचमध्ये झालेल्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत नीरजचे कांस्यपदक थोडक्यात मुकले होते. यावेळी त्याला ऑलिंपिक विजेत्या जर्मनीच्या थॉमस रोहलेरकडून अंतिम थ्रोमध्ये तीन सेंटीमीटरच्या फरकाने पदक गमवावे लागले. तसेच त्याचा या स्पर्धेतील 85.73 मीटर सर्वोत्कृष्ठ थ्रो ठरला.

सप्टेंबर 8 आणि 9ला होणाऱ्या आयएएएफ कॉन्टिनेटल कपमध्ये नीरज सहा भारतीय खेळाडूंसोबत सहभागी होणार आहे. झेक रिपब्लिकमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत आशिया-पॅसिफिक, युरोप, अमेरिका आणि आफ्रिका असे गट असणार आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

शुटींग वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये १६ वर्षीय सौरभ चौधरीचा सुवर्णवेध

‘निवड समितीचा दुजाभाव’ हरभजन सिंगची टीका

ब्राझिलचा रोनाल्डो बनला ला लीगामधील या क्लबचा मालक