जर पाकिस्तान जिंकली तर मुंबईला सचिनच्या घरासमोर पाकिस्तानचा झेंडा फडकविणार

पाकिस्तान भारत सामना असेल तर चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. त्यात जसे भारतीय चाहते मागे नसतात तसे पाकिस्तानी चाहते सुद्धा काहीनाकाही सोशल मीडियाच्या माध्यमातून लिहीत असतात.

परंतु @DennisCricket_ या नावाने ट्विटरवर व्हेरिफाइड असणाऱ्या एका पाकिस्तानी चाहत्याने याच्या पुढची हद्द केली. आपल्या ट्विटमध्ये हा चाहता म्हणतो जर पाकिस्तान आज जिंकला तर मी मुंबईला जाईल आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरासमोर पाकिस्तानी झेंडा फडकावले.

https://twitter.com/DennisCricket_/status/871165224501428224

त्याच्या या ट्विटवर भारतीय संघाच्या पाठीराख्यांनी जोरदार हल्लबोल केला आहे. विशेष म्हणजे त्यातील बरेचशे ट्विट हे मराठीमध्ये आहेत.

त्याच्या दुसऱ्या ट्विटमध्ये तो भारतीय कर्णधार विराट कोहलीला नावे ठेवतो. जर कोहलीने आज शतक केले नाही तर मी त्याला चोकर्स म्हणेल.

https://twitter.com/DennisCricket_/status/871279731693436928

या ट्विपलचा ट्विटर प्रोफाइलवरून तो पाकिस्तानी क्रिकेटचा मोठा चाहता वाटतो. तसेच तो मेलबॉर्नला राहत असल्याचं कळत.