भारतीय संघ लवकरच करू शकतो पाकिस्तान संघासोबत दोन हात !

जर भारत सरकारकडून परवानगी मिळाली तर आम्ही भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मालिकेचे आयोजन करू शकतो असे मत बीसीसीयचे कार्यकारी अध्यक्ष अमिताभ चौधरी यांनी व्यक्त केले आहे.

दिल्ली येथे बीसीसीआयची खास सर्वसाधारण सभा पार पडली. त्यात अनेक निर्णय घेण्यात आले तर काही विषयांवर चर्चाही झाल्या.

बैठकीनंतर मीडियाशी संवाद साधताना अमिताभ चौधरी यांनी भारत पाकिस्तान मालिकेचे संकेत दिले. जर सरकारने परवानगी दिली तर भारत पाकिस्तान द्विस्तरीय मालिका होऊ शकते.

भारत पाकिस्तानमध्ये शेवटचा सामना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत झाला होता ज्यात भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. २००८ पासून या देशात क्रिकेट मालिका होत नसून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड वेगवेगळ्या प्रकारे बीसीसीआयवर मालिका आयोजित करण्यासाठी दबाव टाकत आहे.