२०१२ साली शेवटचा सामना खेळलेल्या त्या खेळाडूला पाहिजे भारतीय संघात स्थान

आशिष नेहरासारख्या खेळाडूने भारतीय संघात कमबॅक केल्यामुळे अनेक विस्मृतीत गेलेल्या खेळाडूंना पुन्हा भारतीय संघात परतण्याचे वेध लागले आहेत. त्यात सर्वात आघडीवर नाव आहे ते इरफान पठाणचे.

बडोदा विरुद्ध आंध्रप्रदेश यांच्यातील रणजी सामन्यावेळी द हिंदू वृत्तपत्राशी बोलताना इरफान पठाण म्हणाला, ” आशिष नेहरा एक लढवय्या खेळाडू आहे. ह्या वयात कमबॅक करण्यासाठी त्याने मोठे कष्ट घेतले आहेत. यापासून त्याने डकवून दिले की जिद्द असेल तर कुणीही हे करू शकते. माझे तर तेवढेही वय नाही. मी माझ्या फिटनेसवर चांगले काम करत आहे. मी क्षेत्ररक्षणावरही कठोर मेहनत घेत आहे. “

इरफान पठाणची क्षमता आणि त्याने केलेली कामगिरी याची कायमच चर्चा होते. याबद्दल बोलताना तो म्हणाला, ” क्षमता आणि कामगिरी याच्यावर कायमच चर्चा होते. क्षमता असून कामगिरी योग्य नाही झाली तर कारणे दिली जातात. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे सर्व चालत नाही. परंतु डावखुऱ्या वेगवान गोलंदाजात मी जगात पहिल्या ५ खेळाडूंमध्ये राहिलो आहे. “

भारतीय संघात पुनरागमन:

“मला खूप आनंद झाला असता जेव्हा मी दुखापतीमुळे संघाबाहेर गेलो तेव्हा मला परत संधी मिळाली असती. मी कधीही खराब खेळतो म्हणून संघाबाहेर गेलो नाही तर दुखापतीमुळे गेलो आहे. मी जेव्हा व्यवस्थित होता असेल तेव्हा मात्र मला संधी मिळाली तर खूप आनंद होईल. “