माझी कारकिर्द सुरू होण्याअगोदरच असे आरोप का?- उसेन बोल्ट

आठ वेळेचा ऑलिंपिक चॅम्पियन जमैकन धावपटू उसेन बोल्टला ऑस्ट्रेलियन स्पोर्ट्स अॅंटी डोपिंग अथॉरिटीने डोपिंग चाचणीची नोटीस पाठवली आहे. याबाबत त्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

बोल्टने काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या ए लीगमध्ये सेंट्रल कोस्ट मरिनर्सकडून खेळताना दोन गोल केले. मॅकार्थर साउथ वेस्ट युनायटेड विरुद्ध झालेला हा सामना मरिनर्सने 4-0 असा जिंकला.

”मी व्यवसायिक खेळातून निवृत्ती घेतली असून सध्या फुटबॉल खेळत आहे पण ही नोटीस बघा”, असे बोल्टने इंस्टाग्रामवरून सांगितले.

”माझी डोपिंग चाचणी कशी काय होऊ शकते कारण मी व्यवसायिक फुटबॉलपटूही नाही”, असेही बोल्ट म्हणाला.

Photo Courtesy: Instagram/ usainbolt

 

 

 

 

 

 

 

 

त्याचे लघवी आणि रक्ताचे नमुने गोळ करण्यास ऑस्ट्रेलियाच्या फुटबॉल फेडरेशनने सांगितले आहे.

ऑस्ट्रेलियन कायद्यानुसार जे खेळाडू जो कोणता खेळ खेळत असेल त्यामध्ये डोपिंग चाचणी असेल तर ती देण जरूरी आहे.

बोल्टने त्याच्या कारकीर्दीत ऑलिंपिकची नऊ सुवर्ण पदके जिंकली होती पण एकामध्ये तो डोपिंग चाचणीत दोषी आढळला होता. ही घटना 2008च्या बीजिंग ऑलिंपिकला झाली. यामुळे त्याचे आठ पदके झाली.

तसेच बोल्टने 11 जागतिक विजेतेपदक मिळवले असून त्यात अनेक 200 मीटर आणि 400 मीटरच्या विक्रमांचा समावेश आहे.

महत्त्वाच्य बातम्या:

ISL 2018: युवा खेळाडू ठरत आहेत लक्षवेधी

ISL 2018: दोनदा विजेतेपद मिळवणाऱ्या या संघांचा सुरू आहे संघर्ष

तूम्ही जर अजिंक्य रहाणे- पृथ्वी शाॅचे फॅन असाल तर ही आहे तूमच्यासाठी सर्वात मोठी बातमी