Video: या गोलंदाजाने नो-बॉलवर झेल घेत केले सेलिब्रेशन, घडला गमतीशीर किस्सा

दक्षिण आफ्रिकेने जरी ऑस्ट्रेलिया अध्यक्षीय संघाला चार विकेट्सने पराभूत केले असले तरी त्यांचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहीरने मात्र स्वत:चे हसे करून घेतले.

झाले असे की, या सामन्याच्या 6व्या षटकात कासिगो रबाडाच्या गोलंदाजीवर जोश फिलिपने पूल शॉट मारला. तेव्हा तो चेंडू बॉण्ड्री लाइनवर उभा असलेल्या ताहीरने पकडला. त्याला वाटले की जोश बाद झाला यामुळे त्याने प्रेक्षकांकडे पाठ करत जर्सीवरील नाव दाखवले पण तो चेंडू नो-बॉल ठरल्याने त्याची फजिती झाली.

जेव्हा ताहीरला कळले की तो नो-बॉल आहे त्याने चेंडू क्षेत्ररक्षणाकडे फेकला. त्यादरम्यान फलंदाजाने दोन धावा काढल्या होत्या.

“तो बॉंड्री लाइनवर नक्की काय करत होता, की त्याला ऐकायला आले नाही तो चेंडू नो-बॉल आहे”, असे फॉक्स स्टारचे समालोचक म्हणाले.

“झेल पकडल्यावर सुद्धा त्याला कळले नाही तो चेंडू नो-बॉल आहे. उत्तम झेल घेतल्यावर तो काहीही न बोलता प्रेक्षकांकडे फक्त जर्सीवरील नाव दाखवत होता.”

उद्यापासून (4 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेसोबत पहिला वन-डे सामना पर्थमध्ये खेळणार आहे. या दोन संघात 3 वन-डे सामन्याची मालिका होणार आहे. अरब अमिरातीमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळताना ज्या चुका झाल्या त्या ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुधारायच्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

धोनीची जागा कोणताही खेळाडू घेऊ शकत नाही, दिग्गज खेळाडू कडाडला

विराटला रोहितच ठरतोय सरस.. जाणुन घ्या काय आहे कारण

टीम इंडियासोबतचे ते प्रकरण सायमंड्सला चांगलेच भोवले…झाला व्यसनी