ड्रॉ सामन्यातही कर्णधार कोहलीकडून ५ खास विक्रम !

दिल्ली । भारतीय संघाने मोठे प्रयत्न करूनही श्रीलंकेविरुद्ध दिल्ली कसोटीत संघाला विजय मिळवता आला नाही. परंतु यावर्षी जबदस्त फॉर्मात असणाऱ्या कर्णधार कोहलीला यावर्षीच्या शेवटच्या सामन्यातही सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

त्याचबरोबर या दिग्गजाने अनेक खास विक्रमही केले. ते असे

– कोहलीने कर्णधार म्हणून सलग ९ मालिका जिंकल्या. याबरोबर त्याने भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया संघाच्या सलग ९ मालिका विजयांची बरोबरी करून दिली.

-या ९ कसोटी मालिका विजयात कोहलीने ६४.४५च्या सरासरीने आणि १० शतकांच्या मदतीने २७०७ धावा केल्या. तोच या काळात कसोटीत भारताकडून सर्वात यशस्वी फलंदाज ठरला.

– एका वर्षात कर्णधार म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विजय मिळवायचा विक्रम आता संयुक्तपणे विराट कोहली आणि रिकी पॉन्टिंग यांच्या नावावर झाला आहे. विराटने कर्णधार म्ह्णून यावर्षी ४६ सामन्यात ३१ आंतरराष्ट्रीय विजय मिळवले असून ११ पराभव पहिले आहेत. विशेष म्हणजे पॉंटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्टेलिया संघाने २००५मध्ये ३० आणि वर्ल्ड ११ संघाने १ असे ३१ विजय मिळवले होते.

-भारतात चौथ्या डावात भारताविरुद्ध २९९ हा श्रीलंका संघाने केलेला सर्वोच्च स्कोर आहे. यापूर्वी १९८७ साली दिल्ली कसोटीच विंडीज संघाने ५ बाद २७६ धावा करत भारताविरुद्ध कसोटी सामना जिंकला होता.

– आर अश्विनने श्रीलंका संघाविरुद्ध कसोटीत ५० विकेट्सचा टप्पा पार केला.