खास विक्रम: ८२ चेंडूत २७९ धावा, तब्बल ४० चौकार आणि १८ षटकार !

मुंबई । येथे झालेल्या एका स्पर्धेत आंध्रप्रदेशच्या एका खेळाडूने जबरदस्त फटकेबाजी करताना एक नवीन विक्रम आपल्या नावे केला. त्याने चक्क ८२ चेंडूत २७९ धावांची तुफानी खेळी केली.

या खेळीत त्या खेळाडूने ४० चौकार आणि १८ षटकार खेचले. व्यंकटेश राव असे या खेळाडूचे नाव. व्यंकटेशच्या २७९ धावांपैकी २६८ धावा ह्या केवळ चौकार आणि षटकाराच्या साहाय्याने आलाय आहेत तर केवळ ११ धावा एकेरी दुहेरीच्या माध्यमातून आल्या.

२४वी राष्ट्रीय अंध क्रिकेट स्पर्धेत खेळल्या गेलेल्या यजमान महाराष्ट्र विरुद्ध आंध्रप्रदेश सामन्यात गुंणा व्यंकटेश राव या खेळाडूच्या २७९ धावांच्या जोरावर आंध्रप्रदेश संघाने ३८० धावांचा डोंगर उभा केला. याला उत्तर देताना यजमान महाराष्ट्राचा डाव ८८ धावांतच संपुष्ठात आला.

महाराष्ट्र संघाच्या तब्बल तीनपट धावा एकट्या व्यंकटेशने केल्या होत्या. आंध्रप्रदेश संघातील अन्य खेळाडूंमध्ये कृष्णा नावाच्या फलंदाजानेही ४१ चेंडूत ७५ धावांची धुव्वादार खेळी केली.

ही २४वी राष्ट्रीय अंध क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्र अंध क्रिकेट असोशिएशनने आयोजित केली आहे.