- Advertisement -

आयपीएल २०१८: राजस्थान विरुद्ध दिल्ली सामन्यात पावसाचा व्यत्यय; असे असेल दिल्लीसमोर विजयासाठीचे लक्ष

0 217

जयपूर। राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला असल्याने सामना काही वेळासाठी थांबण्यात आला आहे.

या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पण राजस्थानची सुरुवात खराब झाली. त्यांनी सलामीवीर फलंदाज डार्सी शॉर्ट(६) आणिअष्टपैलू बेन स्टोक्सची(१६) विकेट लवकर गमावली.

या दोन विकेट लवकर पडल्यानंतर कर्णधार अजिंक्य राहणे आणि संजू सॅमसनने राजस्थानचा डाव सांभाळला. या दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी रचली. हे दोघेही कालांतराने बाद झाले.

रहाणेने आज ५ चौकारांच्या साहाय्याने ४० चेंडूत ४४ धावा केल्या. तर सॅमसने २ चौकार आणि २ षटकार मारताना २२ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. या दोघांनाही शहाबाज नदीमने बाद केले.

त्यानंतर जॉस बटलर(२९), राहुल त्रिपाठी यांनी लढत द्यायला प्रयत्न केला, पण बटलर खेळपट्टीवर स्थिर झाल्यावर बाद झाला. तो बाद झाल्यानंतर काही वेळातच पावसाला सुरुवात झाल्याने खेळ थांबवावा लागला. पावसाला सुरुवात झाली तेव्हा राजस्थान १७.५ षटकात ५ बाद १५३ धावांवर होते. त्रिपाठी(१५*) आणि कृष्णप्पा गॉथम(२*) नाबाद खेळत होते.

दिल्लीकडून शहाबाज नदीम(२/३४), ट्रेंट बोल्ट(१/२६) आणि मोहम्मद शमी(१/२९) यांनी विकेट घेतल्या आहेत.

जर पुन्हा राजस्थान फलंदाजीला आले नाही तर दिल्ली समोर डकवर्थ लुईस नियमानुसार धावांचे आव्हान ठेवले जाईल.

डकवर्थ लुईस नियमानुसार असे असेल दिल्ली समोर धावांचे आव्हान:

५ षटकात ५६ धावा
६ षटकात ६६ धावा
७ षटकात ७७ धावा
८ षटकात ८६ धावा
९ षटकात ९५ धावा
१० षटकात १०३ धावा
११ षटकात ११२ धावा
१२ षटकात १२० धावा
१३ षटकात १२८ धावा
१४ षटकात १३६ धावा
१५ षटकात १४४ धावा
१६ षटकात १५१ धावा
१७ षटकात १५८ धावा

Comments
Loading...
%d bloggers like this: