पहा: ०.०८ सेकंदात धोनीने घेतला झेल

चेन्नई । भारतीय संघाचा यष्टीरक्षक आणि माजी कर्णधार एमएस धोनीच्या यष्टिरक्षणाचे अनेक कारनामे आपण पहिले आहे. परंतु चेन्नई वनडेमध्ये धोनीने यापेक्षा मोठा कारनामा केला आहे.

भारताचा प्रतिभावान फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर धोनीने यष्टींमागे केवळ ०.०८ सेकंदात झेल घेतला. विशेष म्हणजे यावेळी वॉर्नरच्या बॅटला स्पर्श झाला त्यात आणि धोनीच्या झेल घेणयात अंतर होते केवळ ९२ सेंटीमीटर. यावेळी वॉर्नर जेव्हा आपला झेल झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी मागे वळला तेव्हा धोनीने चेंडू हवेत उडवत पुढे चालत आलेला होता.

विशेष म्हणजे या सामन्यात वॉर्नरने चांगली सुरुवात केली होती. शिवाय तो भारतीय फलंदाजांना चांगलाच त्रस्त करत होता. त्यावेळी धोनीच्याच सल्ल्याने कुलदीप यादवने गोलंदाजी करून वॉर्नरला यष्टींमागे झेलबाद केले.