प्रो कबड्डीच्या इतिहास पहिल्यादाच ऑल स्टार मध्ये होणार सामना

प्रो कबड्डी सीजन ७ ला २० जुलै पासून सुरुवात होत आहे. हैदराबाद लेग पासून या सीजनची सुरुवात होणार आहे. पण प्रो कबड्डीला सुरुवात होणाच्या सात दिवस आधी म्हणजे १३ जुलै रोजी प्रो कबड्डी ऑल स्टार असा एक सामना बघायला मिळणार आहे.

सदर सामन्यासाठी इंडिया 7 व वर्ल्ड 7 असे दोन संघ असणार आहेत. इंडिया 7 संघाचे नेतृत्व अजय ठाकूर कडे असणार आहे. तर वर्ल्ड 7 चे नेतृत्व इराणच्या फझल अत्रचली कडे असणार आहे. इंडिया 7 चे कोच बलवान सिंग तर वर्ल्ड 7 चे कोच ईपी राव हे असणार आहेत.

स्टार स्पोर्ट्स व हॉटस्टार वर या सामन्याचे थेट प्रेक्षपण होणार असून सर्व कबड्डी रसिकांना या सामन्याचा आनंद घेता येईल. १३ जुलै रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता सामन्याला सुरुवात होईल. प्रो कबड्डीच्या इतिहासात पहिल्यादाच ऑल स्टार सामना बघायला मिळणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

बारामती स्पोर्ट्स अकॅडमीच्या चार खेळाडूंची पुणे कबड्डी लीग साठी निवड.

६६ वी महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्रांची विजयी सलामी. जाणून घ्या पहिल्या दिवसाचे निकाल.