१६१ कसोटीत कूकला जे जमले नाही ते सॅम करनने ७ कसोटीत करुन दाखवले

पल्लेकेल | इंग्लंड विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु त्यांचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला आहे.

सध्या इंग्लंडने ७५.४ षटकांत सर्वबाद २८५ धावा केल्या आहेत. यावेळी अडचणीत असलेल्या संघाच्या मदतीला पुन्हा सॅम करन आला.

त्याने आज तळाच्या फलंदाजाबरोबर फलंदाजी करत संघाला अडचणीतून बाहेर काढले. एकवेळ ६ बाद १६५ अशी अवस्था इंग्लंडची होती.

करनने आज ११९ चेंडूत नाबाद ६४ धावांची खेळी केली आहे. यात करनने ६ षटकार खेचले आहे.

केवळ ११ सामने खेळलेल्या करनने कारकिर्दीत १४ षटकार मारले आहेत तर तब्बल १६१ कसोटी खेळलेल्या अॅलस्टर कूकने कारकिर्दीत केवळ ११ षटकार मारले आहेत.

कसोटीत आजपर्यंत २९४९ खेळाडू खेळले आहेत. त्यातील केवळ २०९ खेळाडूंना संपुर्ण कारकिर्दीत १४ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारता आले आहेत. करनने हा पराक्रम केवळ ७ कसोटीत केला आहे.

वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

टीम इंडियाला नडलेल्या सॅम करनचा श्रीलंकेला तडाखा

डिव्हिलियर्स वादळाचा तडाखा, केले शानदार पुनरागमन

बालदिनाचे औचित्य साधून केकेआरने केले हे खास सेलिब्रेशन, पहा फोटो...

सुरेश रैनाचा रणजी ट्राॅफीमधील हा कहर कॅच पाहिलाय का?

हा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ सांगतो, धोनी धोनी हैं!

युझवेंद्र चहलचे टीम इंडियातील हे तीन खेळाडू आहेत दादा