आज सह्याद्री वाहिनीच्या “महाचर्चा” कार्यक्रमात “गौरव कबड्डीचा” यावर चर्चा.

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्र.दि.१९जुलै२०१९ रोजी सायं.५-०० ते ६-०० या वेळेत थेट प्रक्षेपित होणाऱ्या “महाचर्चा” या कार्यक्रमात “गौरव कबड्डीचा” या विषयावर विशेष कार्यक्रम होणार आहेत. या चर्चेच्या निमित्ताने “कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी यांनी कबड्डी खेळाच्या उन्नती आणि उत्कर्षाकरिता केलेल्या अतुलनीय व गौरवास्पद कार्याला उजाळा मिळणार आहे.

या चर्चा सत्रात सौ.माया मेहेर-आक्रे(अर्जुन व शिवछत्रपती), श्रीराम (राजू) भावसार ( अर्जुन व शिछत्रपती), सुरेश पावसकर (राष्ट्रीय पंच आणि संघटक ), शशिकांत राऊत(राष्ट्रीय पंच आणि कबड्डी संघटक), सायली केरीपाळे(शिवछत्रपती), कोमल देवकर(शिवछत्रपती), आकाश गोजारे(युवा कबड्डीपट्टू) हे सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर सौ.माया आक्रे-मेहर (अर्जुन- शिवछत्रपती) या ध्वनिचित्र मुद्रित मुलाखतीत सहभागी होणार आहेत.

तसेच या चर्चेत दूरध्वनी थेट संपर्क यंत्रणेद्वारे तारक राऊळ (शिवछत्रपती), सुधीर पवार (रत्नागिरी कबड्डी संघटनेचे माजी सचिव) सहभागी होणार आहेत. चर्चा सत्राचे सूत्र संचालन संजय भुसकुटे हे करणार असून दूरदर्शन निर्मिती आणि दिग्दर्शन जयु भाटकर यांचे आहे.

शुक्रवार दि.१९जुलै २०१९ रोजी सायंकाळी ५-०० वा. याचे थेट प्रक्षेपण होणार असून, पुनरप्रसारण शनिवार दि. २०जुलै २०१९ रोजी रात्रौ १०-३० वाजता सह्याद्री वाहिनीवर दाखविण्यात येणार आहे.