कबड्डीच्या पहिल्या सरपंच चषकाचा थरार उद्यापासून

नारायणगाव । सध्या कबड्डीचा हंगाम जोरात सुरू असून उत्तर पुणे जिल्ह्यात उद्या प्रथमच मोठ्या कबड्डी स्पर्धेचा थरार चाहत्यांना अनुभवता येणार आहे. समस्त ग्रामस्थ नारायणगाव, वारुळवाडी आयोजित पुणे जिल्हा व जुन्नर तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने सरपंच चषक अर्थात जुन्नर कबड्डी लीग २०१८ उद्यापासून सुरू होत आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन मंगळवार, दिनांक १ मे २०१८ रोजी सायंकाळी नारायणगाव येथे सायं ५.०० वा. होणार आहे. तर बक्षीस समारंभ गुरुवार दि. ३ मे २०१८ वेळ रात्रौ. ९.०० वा. होणार आहे.
ही स्पर्धा शिव मुक्ताई गार्डन मंगल कार्यालयासमोर (मीना नदी किनारी), नारायणगाव येथे होणार आहे.

या स्पर्धेत जुन्नर,आंबेगाव, खेड या तालुक्यातील खेळाडूंचा समावेश असून एकूण ८ संघांकडून ९६ खेळाडू सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेत जे ८ संघ सहभागी होणार आहेत त्यांची नावे अशी-

सचिन स्पोर्ट्स क्लब गुंजाळवाडी, ओमसाई टायगर्स वडगाव सहाणी, स्वराज्य वॉरियर्स हिवरे, अतुलदादा बेनके स्पोर्टस क्लब, राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान जुन्नर तालुका , गणपीर चॅम्पियन्स, वारुळवाडी, शिवस्वराज्य चॅलेंजर्स, नारायणगाव , श्री गणेश फायटर्स, नारायणगाव

बक्षिस-
या स्पर्धेत विजेतेपद जिंकणाऱ्या संघाला ४१००० रु, उपविजेत्या संघाला ३१००० रु, तृतीय क्रमांकास २१००० रु, चतुर्थ क्रमांक १५०००रु तसेच पाचव्या, सहाव्या, सातव्या आणि आठव्या क्रमांकास प्रत्येकी ५००० रुपये देण्यात येणार अाहे.