ऑस्टेलिया-भारत ही शेवटची ५ सामन्यांची वनडे मालिका

कोलकाता । सध्या सुरु असलेली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ५ सामन्यांची वनडे मालिका ही अशा प्रकारची शेवटची वनडे मालिका असणार आहे. यापुढे दोन देशांत जास्तीजास्त ३ सामन्यांच्या वनडे मालिका होऊ शकतात.

काय आहे नक्की हे प्रकरण ?
आयसीसीच्या मीटिंगमध्ये झालेल्या निर्णयाप्रमाणे यापुढे १३ देश जे वनडे खेळतात ते यापुढे वनडे ग्लोबल लीग खेळणार आहेत. जिची सुरुवात २०२० नंतर होणार आहे. २०१९ विश्वचषक हा इंग्लंड देशात होत आहे. त्यानंतर प्रत्येक देश दुसऱ्या देशाबरोबर अनिवार्य असे ३ सामने घराच्या आणि दुसऱ्या देशाच्या मैदानावर खेळणार आहे. ही लीग सोडून दोन देश त्यांच्यात वनडे मालिका घेण्यासाठी मोकळे असतील परंतु त्यांना आयसीसीची मान्यता लागेल.

जेम्स सदरलँड म्हणाले, “ मला नाही वाटत कोणता देश भविष्यात ३ पेक्षा जास्त वनडे सामन्यांची मालिका खेळेल. ते त्यापेक्षा टी२० सामन्यांचे त्याच मालिकेत आयोजन करतील आणि त्याचमुळे आपण ५ वनडे सामन्यांची मालिका यापुढे पाहू शकत नाही. ”

परंतु हे सर्व तेव्हाच शक्य आहे जेव्हा कसोटी वर्ल्ड कप आणि वनडे ग्लोबल लीग सुरु होईल.