तिसरी कसोटी: भारताला दुसरा झटका !

पल्लेकेल: येथे सुरू असलेल्या श्रीलंका आणि भारत विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला के एल राहुलनंतर आता दुसरा झटका बसला आहे. शतकवीर शिखर धवन १२३ चेंडूत ११९ धावा करून बाद झाला आहे. भारताचे दोन्ही सलामीवीर आता तंबूत परतले आहेत.

शिखर धवनने ४८व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि स्क्वेअर लेगवर उभा असलेल्या कर्णधार दिनेश चंडिमलने उत्कृष्ट झेल घेऊन धवनला परतीचा मार्ग दाखवला. भारताच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजाना पुष्पकुमारानेच बाद केले.

आता मैदानात भारताचे दोन स्टार फलंदाज खेळत आहेत. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांवर आता चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊन मोठी धावसंख्या उभारण्याची जबाबदारी असेल. भारत आता २१९-२ अश्या स्थितीत आहे.