Video: मुंबईकरांनी केले धोनीचे उत्साह पूर्ण स्वागत

मुंबई | येथे खेळण्यात येणारा भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात धोनीचे मुंबईकरांनी जोरदार स्वागत केले आहे. मुंबईच्या याच मैदानावर महेंद्रसिंग धोनीने षटकार मारून २०११चा विश्वचषक भारताला जिंकून दिला होता. मुंबईकरच नाही तर संपूर्ण भारतीय क्रिकेटप्रेमी अजूनही तो क्षण विसरलेले नाहीत.

धोनीचे चाहते संपूर्ण भारतात आहेत हे सर्व जण जाणतात. मागील काही काळात धोनीची कामगिरी जरी खालावलेली असली तरी त्याच्या चाहत्यांचे प्रेम त्याच्यावर अजूनही तितकेच आहे. भारताच्या या घरच्या मोसमाची सुरुवात चेन्नईच्या मैदानावर झाली जेथे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळला.

त्याही सामन्यात धोनीचे चाहत्यांनी जोरदार स्वागत केले होते. धोनी चेन्नईत खूप लोकप्रिय आहे कारण तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स या संघाचे नेतृत्व करतो.

चेन्नईमध्ये चालू झालेला हा ट्रेण्ड संपूर्ण मोसमात आपल्याला बघायला मिळाला. धोनीची लोकप्रियता ही संपूर्ण देशात आहे आणि वानखेडे स्टेडियम ही त्याला अपवाद नाही. वानखेडे स्टेडियमवर जेव्हा धोनीने आज पाऊल ठेवले तेव्हा मुंबईकरांनी त्याचे जोरदार स्वागत केले.

जेव्हा दिनेश कार्तिक बाद झाला त्यानंतर धोनीचे मैदानात आला. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या धोनीचे संपूर्ण वानखेडे स्टेडियमने उभे राहून टाळ्या वाजून भारताच्या या माजी कर्णधाराची स्वागत केले.

२००४ मध्ये पदार्पण केलेला धोनी आणि २०१७ मधील धोनी यात जमीन आस्मानाचा फरक आहे. धोनी आता जरी आधी सारखी फलंदाजी करू शकत नसला तरी सुद्धा तो भारतीय संघाचा एक प्रमुख फलंदाज आहे फक्त फलंदाजीतच नाही तर भारताचा कर्णधार विराट कोहलीला नेतृत्व करण्यात मदत करण्यात ही धोनी मोलाची कामगिरी बजावतो.

याच वर्षी धोनीने श्रीलंका विरुद्धच्या वनडे सामन्यात वनडे कारकिर्दीतील ३०० सामन्यांचा टप्पा पार केला आहे. धोनीने आतापर्यंत वनडे कारकिर्दीत ५१ च्या सरासरीने ९७८३ धावा केल्या आहेत त्यात १० शतकांचा समावेश आहे तर ६६ अर्धशतके ही केली आहेत.

पहा बीसीसीआयने प्रसिद्ध केलेला हा खास व्हिडिओ: