वानखेडे ऐवजी या मैदानावर होणार भारत विरुद्ध विंडिज चौथा वनडे सामना

मुंबई| भारत आणि विंडिज यांच्यातील 29 आॅक्टोबरला होणारा चौथा वन-डे सामना आता मुंबई क्रिकेट संघटनेच्या वानखेडे स्टेडियम होणार नसल्याचा निर्वाळा बीसीसीआयने दिला आहे. हा सामना मुंबईमधील क्रिकेट क्लब आॅफ इंडियाच्या ब्रेबाॅर्न स्टेडियमवर होणार आहे.

एमसीएला सध्या कुणीही अध्यक्ष किंवा सचिव नसल्यामुळे वेंडरला देण्यासाठीचे पैसे काढता येत नसल्यामुळे या सामन्याचे ठिकाण बदलवण्यात आले आहे. विजय हजारे ट्राॅफीमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंच्या हाॅटेलचे पैसेही देण्यात आले नव्हते. वेंडरला पैसे बीसीसीआयने द्यावे असी विनंती एमएसीएकडून करण्यात आली होती.

बीसीसीआयने एमसीएची ही विनंती फेटाळून लावत सामना ब्रेबाॅर्न स्टेडियमवर खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

“आदरणीय सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीच्या सदस्यांच्या सुचनेनुसार 29 आॅक्टोबरला होणारी भारत आणि विंडिज यांच्यातल्या वन-डे सामन्याचे ठिकाण वानखेडे मैदावरून ब्रेबाॅर्न मैदानावर हलवण्यात आले आहे.” असे बीसीसीआयने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-