विंडिज विरुद्ध चमकदार कामगिरी करणाऱ्या उमेश यादववर दिग्गजांकडून कौतुकाचा वर्षाव

भारत आणि विंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विंडिजचा डाव 311 धावांवर आटोपला. भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवने 88 धावांच्या मोबदल्यात विंडिजच्या 6 फलंदाजांंना माघारी धाडले.

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर उमेशने प्रथमत: बिशूला त्यानंतर चेसला आणि शेवटी ग्रॅबियलला बाद केले. या सामन्यात जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकुरला त्याचे वैयक्तिक दुसरे षटक टाकताना दुखापतीमुळे सामन्या बाहेर जावे लागले.

शार्दुल बाहेर गेल्यामुळे जलगती गोलंदाजीची धुरा एकट्या उमेशच्या खांद्यावर येऊन पडली. उमेशने त्याच्या वरची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली.

उमेश हा भारतामध्ये 21 व्या शतकातील एकाच डावात 6 विकेट घेणारा एकमेव भारतीय वेगवान गोलंदाज बनला आहे. उमेशच्या या अप्रतिम कामगिरीवर  अनेक दिग्गजांनी आनंद व्यक्त केला आहे. यामध्ये  सचिन तेंडूलकर, युवराज सिंग, संजय मांजरेकर, आरपी सिंग, सुब्रमानी बद्रिनाथ, आणि आकाश चोपडा यांचा समावेश आहे.

 

महत्वाच्या बातम्या-