विजयाच्या आनंदात शास्त्री- कोहलींकडून घडली मोठी चूक

सोमवारी(7 जानेवारी) भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 असा विजय मिळवत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत विजय मिळवण्याचा इतिहास घडवला आहे.

या विजयानंतर भारतीय संघाने चांगलाच जल्लोष केला. मात्र या आनंदाच्या भरात भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीने काही वादात्मक विधाने केले आहे.

शास्त्री यांनी सामन्यानंतर म्हटले होते की “1983 चा विश्वचषक आणि 1985चा वर्ल्ड चॅम्पियनशीप हे दोन्ही विजय मोठे होते. पण ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीमध्ये मिळवलेला आजचा विजय त्याहीपेक्षा मोठा आहे. कारण कसोटी क्रिकेट हे खूप कठीण असते.”

तसेच शास्त्री हे विराट बद्दल म्हणाले होते की “कसोटीमध्ये विराट सारखा कोणीही खेळू शकत नाही. तो एक सर्वोत्तम कर्णधार आहे.”

विशेष म्हणजे शास्त्री हे 1983 चा विश्वचषक आणि 1985चा वर्ल्ड चॅम्पियनशीप या दोन्ही स्पर्धेत खेळले आहेत.

यावेळी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला नसतानाही शास्त्रींनी माजी खेळाडूवर टीका केली. यामुळे याची माध्यम तसेच चाहत्यांमध्ये मोठी चर्चा झाली.

त्याचबरोबर विराट या कसोटी मालिका विजयानंतर म्हणाला होता की, ‘ माझ्यासाठी हे सर्वोच्च शिखर आहे. जेव्हा आम्ही 2011 चा विश्वचषक जिंकलो होतो, तेव्हा मी संघातील युवा खेळाडू होतो. त्यावेळी मी प्रत्येकाला भावनिक झाल्याचे पाहत होतो. पण माझ्या त्यांच्यासारख्या भावना नव्हत्या.’

‘इथे(ऑस्ट्रेलिया) मी तीन वेळा आलो आहे त्यामुळे हा विजय नक्कीच विशेष आहे. हा कसोटी विजय आम्हाला नवीन ओळख देईल. आम्ही जे मिळवले आहे त्याचा अभिमान आहे.’

याआधीही शास्त्री यांनी 2018 मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना सध्याचा भारतीय संघ परदेशात सर्वोत्तम कामगिरी संघ असल्याचे म्हटले होते. त्यामुळेही त्यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

८ सामन्यात तब्बल ६८ विकेट घेत या गोलंदाजाने माेडला ४४ वर्ष जूना विक्रम

रोहित शर्माकडून बेबी सिटिंगसाठी रिषभ पंतला विचारणा

कॉफी विथ करन हार्दिक पंड्या, केएल राहुलला पडले महागात…