आॅस्ट्रेलियन गोलंदाज नजरकैदेत, ड्रोनच्या सहाय्याने संघ व्यवस्थापनाने लढवली ही शक्कल

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताने पहिल्या कसोटी सामन्यात 31 धावांनी विजय मिळवला आहे. यामुळे भारत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0ने आघाडीवर आहे.

उद्यापासून (14 डिसेंबर) पर्थ येथील ऑप्टस मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाने चांगलाच सराव केला.

ऑस्ट्रेलिया संघानेही आज (13 डिसेंबर) जोमात सराव केला. मात्र कर्णधार टिम पेन हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे तो अधिक वेळ सराव करू शकला नाही.

तसेच पर्थची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उत्तम आहे. यामुळे मिशेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि पीटर सिडल या ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनीही कसून सराव केला आहे.

ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लॅंगर आणि गोलंदाज प्रशिक्षक डेव्हीड साकर यांनी अंपायरच्या जागेवर एक कॅमेरा आणि ड्रोन कॅमेराही लावला होता. ज्यामुळे सराव करत असलेल्या मिशेल स्टार्कवर लक्ष ठेवता येईल.

ऑस्ट्रेलिया संघातील सध्या खेळत असलेल्या गोलंदाजांपैकी स्टार्कनेच पर्थवर अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे स्टार्कची पर्थ कसोटीतील कामगिरी आॅस्ट्रेलियाच्या संघासाठी महत्त्वाची ठरणार आहे. यामुळेच त्याच्यावर प्रशिक्षक लक्ष ठेवून आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

आॅस्ट्रेलिया-भारत: जाणून घ्या, पर्थ कसोटीबद्दल सर्वकाही…

तरच कोहलीची टीम इंडिया ठरणार क्रिकेट जगतातील किंग

अश्विन-रोहित तर बाहेर गेलेच, पण आता टीम इंडियासमोर नविनच संकट