जबरदस्त गोलंदाजी करणाऱ्या भारताच्या युवा गोलंदाजाचे मास्टर ब्लास्टरकडून कौतुक

रविवारी, 8 जुलैला पार पडलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने 7 विकेटने विजय मिळवून 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली.

हा सामना संपल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने ट्विटरवर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षावही केला होता.

तसेच या सामन्यात भारताचा मध्यमगती गोलंदाज सिद्धार्थ कौलने घेतलेल्या 2 विकेट्सचेही सचिनने ट्विट करुन कौतुक केले होते. तसेच त्याने या ट्विटमधून सिद्धार्थला मिळालेल्या यशाचे कारणही सांगितले.

सचिनने ट्विट केले की, ‘सिद्धार्थने गोलंदाजी करताना योग्यवेळी विविधता ठेवली हेच त्याला 2 विकेट्स मिळण्यामागच्या यशाचे कारण आहे. चांगला खेळ झाला.’

सचिनच्या या ट्विटला पाहुन सिद्धार्थला खूप आंनद झाल्याचे त्याने सचिनला उत्तरादाखल केलेल्या ट्विटमधून दिसून आले.

सिद्धार्थ ने ट्विट केला की, ‘अजून काय मागणाार? माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी प्रशंसा आहे. मी कायमच याला माझ्या हृदयाच्या जवळ ठेवेल. सचिन सर तूमचे खूप आभार. जेव्हाही मी मैदानावर पाय ठेवेल तेव्हा मी माझ्यातील उत्तमच द्यायचा प्रयत्न करेल. मी हे तुमच्याकडूनच शिकलो आहे.’

सिद्धार्थने 29 जून 2018 ला आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. तसेच त्याने यावर्षीच्या आयपीएलमध्येही उत्कृष्ट कामगिरी करताना प्रभावित केले होते.

महत्त्वाच्या बातम्या:

-मास्टर ब्लास्टकडून लिटल मास्टरचे अभिष्टचिंतन

-फेडरर म्हणतो, भाऊ आधी विंबल्डन फायनल; फिफा फायनलच नंतर बघू

-भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला दिग्गज होणार पॉंडेचरीचा कोच