टॉप ५: भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील कसोटी मालिकेत होणार हे खास विक्रम

राजकोट। गुरुवार, 04 आॅक्टोबरपासून भारत विरुद्ध विंडिज यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे.

याबरोबरच भारतीय़ संघाने पहिल्या सामन्यासाठी बुधवारी अंतिम 12 खेळांडूंची नावेही जाहिर केली आहेत. या सामन्यातून भारताचा प्रतिभाशाली युवा फलंदाज पृथ्वी शॉ आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार आहे.

12 खेळाडूंच्या या संघात विराट कोहली, केएल राहुल, पृथ्वी शाॅ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे.

भारतीय संघ या मालिकेतून पुन्हा एकदा कसोटीत विजयाची सुरुवात करण्यास आतूर आहे, तर 24 वर्षांनंतर भारतात कसोटी मालिका जिंकण्याच्या इराद्याने विंडिजचा संघ खेळेल.

या मालिकेत काही खास विक्रमही होणार आहेत. ते असे-

-विंडिज विरुद्ध होणारा पहिला कसोटी सामना हा विराट कोहलीचा कर्णधार म्हणून 41 वा सामना असणार आहे. त्यामुळे तो नवाब पतौडी यांना मागे टाकणार आहे. पतौडी यांनी भारताचे 40 कसोटी सामन्यात नेतृत्व केले आहे.

याबरोबरच कसोटीमध्ये भारताचे सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करण्याच्या यादीतही विराट चौथ्या क्रमांकावर येईल.

-क्रेग ब्रेथवेटला विंडिजकडून 50 वा कसोटी सामना खेळण्याची संधी आहे. त्याने आत्तापर्यंत 49 कसोटी सामन्यात 37.94 च्या सरासरीने 3263 धावा केल्या असून यात 8 शतके आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे.

-विराटला 2018 मध्ये कसोटीत 1000 धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज बनण्यासाठी केवळ 121 धावांची गरज आहे. त्याने 2018 या वर्षात कसोटीत 8 सामन्यात 54.93 च्या सरासरीने 879 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 3 शतकांचाही समावेश आहे.

-मायदेशात 3000 कसोटी धावा पूर्ण करण्यासाठी विराटला 79 धावांची गरज आहे. असा पराक्रम करणारा तो 11 वा भारतीय फलंदाज बनू शकतो. त्याने आत्तापर्यंत भारतात 32 कसोटी सामने खेळले असून यात त्याने 63.50 च्या सरासरीने 2921 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 10 शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे.

-चेतेश्वर पुजाराला कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा पार करण्यासाठी 191 धावांची गरज आहे. जर त्याने हा टप्पा पार केला तर तो असा पराक्रम करणारा 12 भारतीय क्रिकेटपटू ठरेल. त्याने आत्तापर्यंत 62 कसोटी सामन्यात 49.57 च्या सरासरीने 4809 धावा केल्या आहेत.

-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 विकेट्सचा टप्पा पार करण्यासाठी विंडिजचा कर्णधार जेसन होल्डरला 2 विकेट्सची गरज आहे. याआधी असा कारनामा विंडिजच्या 17 गोलंदाजांनी केला आहे. याबरोबरच होल्डरला कसोटीत 1500 धावा करण्यासाठी केवळ 17 धावांची गरज आहे.

-अजिंक्य रहाणेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6500 धावांचा टप्पा गाठण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. याआधी 19 भारतीय क्रिकेटपटूंनी हा टप्पा पार केला आहे. रहाणेने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 160 सामन्यात 36.24 च्या सरासरीने 6487 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

कसोटी मालिकेत निवड झालेल्या त्या ३ खेळाडूंबद्दल गांगुलीने केले मोठे भाष्य

एका मुंबईकराच्या दुसऱ्याकडून मोठ्या अपेक्षा, शाॅकडून रहाणेला आहे ही गोष्ट अपेक्षित

या तीन दिग्गजांनी दिलेला मंत्र १८ वर्षीय पृथ्वी शाॅच्या कामी आला