ही दोस्ती तुटायची नाय… काय आहे या खास मैत्रीचे कारण?

तिरुअनंतपुरम | भारताने विंडीजला आज झालेल्या (1 नोव्हेंबर) शेवटच्या वनडे सामन्यात 9 विकेट्सने पराभूत केले. यामुळे भारताने पाच सामन्यांची वनडे मालिका 3-1 अशी जिंकली आहे.

यावेळी भारताकडून रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीने नाबाद अनुक्रमे 63 आणि 33 धावा केल्या. यावेळी या दोघांनी 99 धावांची भागीदारी केल्याने या जोडीच्या वनडेमध्ये 4000 धावा पूर्ण झाल्या आहेत. असा पराक्रम करणारी ही सहावी भारतीय जोडी ठरली आहे.

तसेच या दोघांनी केवळ 66 भागीदाऱ्या करत वनडेतील 4000 धावा पूर्ण केल्या आहेत. याआधी राहुल द्रविड-सौरव गांगुली या जोडीला 4000 धावा पूर्ण करण्यास 80 भागीदाऱ्या लागल्या होत्या.

याआधी भारताकडून वनडेमध्ये एकूण पाच जोड्यांनी 4000 धावा पूर्ण केल्या आहेत. यामध्ये सौरव गांगुली-सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग-सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड-सौरव गांगुली, राहुल द्रविड- सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा-शिखर धवन यांचा सहभाग आहे.

तसेच विराटने वनडेमध्ये यावर्षी सर्वाधिक 1202 धावा केल्या तर रोहितने 1030 धावा केल्या आहेत. मागील वर्षीही ह्या दोघांनी वनडेत उत्तम कामगिरी करत 1000 धावांचा टप्पा गाठला होता. त्यामध्ये विराटने 1460 तर रोहितने 1293 धावा केल्या होत्या. 2018 आणि 2017 मध्ये वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूमध्ये विराट अव्वल तर रोहित दुसऱ्या स्थानावर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

ती एक धाव आणि ती एक विकेट… धोनी-भुवीला पडली भलतीच महागात

एकवेळ क्रिकेट गाजवणाऱ्या सर्वच दिग्गजांचे विक्रम रोहितने आरामात घातले खिशात

हिटमॅन रोहित शर्माचा वन-डेत धमाका, केला असा काही कारनामा जो कुणालाही जमला नाही

बीसीसीआयच्या ‘या’ मोठ्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात