धोनीवर आजपर्यंत अशी वेळ कधीच आली नव्हती

तिरुअनंतपुरम | आज (1 नोव्हेंबर) झालेल्या अखेरच्या आणि पाचव्या वनडे सामन्यात भारताने विंडीजवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत पाच वनडे सामन्यांची मालिका 3-1 अशी खिशात घातली आहे.

हा सामना भारतीय संघाचा यावर्षाचा शेवटचा वनडे सामना आहे. ते पुढील वर्षी 12 जानेवारीला ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सामना खेळणार आहे. परंतु त्याला या वर्षी क्रिकेटमध्ये एकही अर्धशतक करता आले नाही. यावर्षी त्याची वन-डेतील धावसंख्या नाबाद 42 राहिली आहे.

धोनीने भारताकडून 23 डिसेंबर 2004मध्ये वनडेत पदार्पण केले. त्यावर्षी त्याला फक्त 3 वनडे सामने खेळता आले. यात त्याने 9.50च्या सरासरीने 19 धावा केल्या. तर 2018मध्ये त्याने 20 सामन्यात 25च्या सरासरीने 275 धावा केल्या.

त्याने 2004 आणि 2018 या दोन वर्षात एकही शतक किंवा अर्धशतक केले नाही. तब्बल 15 वर्षे क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि वनडेत 67 अर्धशतके करणाऱ्या धोनीसाठी ही 2 वर्ष खराब राहिली.

आजचा सामना ही भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असणाऱ्या एमएस धोनीला भारताकडून 10000 धावा पूर्ण करण्याची शेवटची संधी होती. मात्र त्याला विंडीज विरुद्धच्या या सामन्यात फलंदाजी करण्याची संधी न मिळाल्याने त्याच्याकडून हा पराक्रम करण्याचा थोडक्यात राहिला. आतापर्यत धोनीने वनडेत भारताकडून 9999 धावा केल्या आहेत.

भारतीय संघ यावर्षी मायदेशात आता केवळ 3 टी-20 सामने खेळणार आहे. हे सामने विंडीजविरुद्ध कोलकाता (4 नोव्हेंबर), लखनऊ(6 नोव्हेंबर) आणि चेन्नई ( 11 नोव्हेंबर) येथे होणार आहे.

त्यानंतर भारतीय संघ आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार असुन यात पहिल्यांदा 3 सामन्यांची टी-20, नंतर 4 सामन्यांची कसोटी आणि शेवटी 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या दौऱ्यातील पहिला वनडे सामना 12 जानेवारी रोजी खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

सव्वादोन तासात भारतीय गोलंदाजांनी असा काही कारनामा केला की कुणी विचारही केला नसेल

ही दोस्ती तुटायची नाय… काय आहे या खास मैत्रीचे कारण?

ती एक धाव आणि ती एक विकेट… धोनी-भुवीला पडली भलतीच महागात